ओडिशा ट्रेन अपघात: मोठी अपडेट! सिग्नल JE चे कुटुंब त्या दिवसापासून बेपत्ता, सीबीआयकडून घर सील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:14 AM2023-06-20T09:14:48+5:302023-06-20T09:15:40+5:30
कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला अपघात झाला होता. एसएमव्हीपी-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि एक मालगाडी अशा तीन रेल्वे एकमेकांवर आदळल्या होत्या.
भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर ट्रेन अपघातप्रकरण मोठी अपडेट समोर येत आहे. सीबीआयने तपास सुरु केला असून बालासोर रेल्वे स्टेशन परिसर सील केल्यानंतर आता सिग्नल यंत्रणा हाताळणाऱ्या इंजिनिअरचे घर सील करण्यात आले आहे. तो आणि त्याचे कुटुंबीय बेपत्ता असल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळली आहे.
कोरोमंडल एक्सप्रेसला २ जूनला अपघात झाला होता. एसएमव्हीपी-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि एक मालगाडी अशा तीन रेल्वे एकमेकांवर आदळल्या होत्या. याची चौकशी सीबीआयने हाती घेतली होती. यानंतर सीबीआयने बालासोर स्टेशन सील केले होते. या स्टेशनवर चौकशी पूर्ण होत नाही तोवर एकही ट्रेन थांबणार नाहीय.
यानंतर सीबीआयने सिग्नल जेईची पुन्हा चौकशी करण्यासाठी त्याचा शोध घेतला. परंतू, तो आणि त्याचे कुटुंबीय अपघाताच्या दिवसापासून पसार झाले आहेत. तो राहत असलेले भाड्याचे घरही बंद आहे. अखेर सीबीआयने ते घर सील केले आहे.
सीबीआयच्या सुत्रांनी सांगितले की, सिग्नलच्या ज्युनिअर इंजिनिअरची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. सीबीआयने १६ जूनला बालासोर सोडले होते, यानंतर ते अचानक सोमवारी आले आणि ज्युनिअर इंजिनिअरचे घर सील केले. सहा जूनपासून सीबीआयने अपघाताची चौकशी हाती घेतली आहे.