Odisha Train Accident: इंटरलॉकिंग सिस्टममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड? बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 11:16 AM2023-06-06T11:16:03+5:302023-06-06T11:17:00+5:30
ओडिशा रेल्वे अपघाताचा तपास सुरू आहे. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये छेडछाड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Odisha Train Accident: ओडिशा येथील बालोसोर ट्रेन अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यात ११०० जण जखमी झाले आहेत, या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे रेल्वेच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचे पुरावेही सापडल्याचे तपासात सांगण्यात येत आहे. अपघातानंतर सर्वाधिक चर्चा या इंटरलॉकिंग प्रणालीची झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्राथमिक तपासाच्या आधारे या यंत्रणेत गडबड असण्याची शक्यता व्यक्त केली होती.
दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी
सीआरबी रेल्वेने पंतप्रधान कार्यालयाला अपघाताची माहिती दिली आहे. अपघाताबाबत रेल्वेने भीती व्यक्त केली आहे की, जी काही घटना घडली, ती पॉइंट बदलल्यामुळे घडली आहे. पीएमओला सांगण्यात आले की, रेल्वेला असे वाटते की हे सर्व मुद्दाम केले आहे किंवा एखाद्याने केले आहे ज्याला या मुद्द्याची पूर्ण माहिती आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, प्राथमिक तपासणीत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये छेडछाड केल्याचा स्पष्ट पुरावा आढळला आहे. सीबीआयच्या तपासात याबाबत आणखी काही खुलासे होतील. या अपघातामागे कोणाचा हात आहे, हा अपघात कोणी घडवून आणला, अपघात कसा घडला याचा शोध सीबीआय घेईल.
"इंटरलॉकिंग सिस्टम ही सिग्नलिंगची एक अतिशय सुरक्षित पद्धत आहे. याला 'फेल सेफ' म्हणतात, याचा अर्थ असा की जर सिस्टीममध्ये बिघाड झाला, तर सर्व सिग्नल लाल होतील आणि सर्व गाड्या थांबतील, अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत कोणीतरी या इंटरलॉकिंग प्रणालीशी जाणीवपूर्वक छेडछाड करत नाही, तोपर्यंत मेन लाइनसाठी नियुक्त केलेली लाईन लूप लाइनने बदलणे शक्य नाही. यावर तपास करावा, अशी शिफारस अधिकाऱ्यांनी केली आहे. भारतीय रेल्वे वापरत असलेल्या इंटरलॉकिंग सिस्टमला चार प्रमाणपत्रे आहेत आणि ती १०० टक्के सुरक्षित मानली जाते.