Odisha Train Accident : काय आहे रेल्वेची इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? जिच्यामुळे 275 जणांचा जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 06:13 PM2023-06-04T18:13:51+5:302023-06-04T18:14:25+5:30
या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वेअपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अपघातानंतर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेचे कारण सांगितले आहे. ही घटना इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बिघाडामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही वैष्णव यांनी सांगितले. अपघातानंतर, ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवारी सकाळपासून रेल्वे रुळावरून धावू लागतील, असेही ते म्हणाले. या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.
काय आहे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? -
सिग्नलिंग कंट्रोल करण्यासाठी रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा वापर करते. ही एक सिक्योरिटी सिस्टिम आहे. जी रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी सिग्नल आणि स्विचदरम्यान ऑपरेटिंग सिस्टिमला कंट्रोल करते. या सिस्टिमच्या माध्यमाने ट्रॅक्सवर ब्लॉक केलेल्या आणि सुरक्षित असलेल्या रेल्वे गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. हिच्या माध्यमाने रेल्वे यार्डची कामे अशा प्रकारे नियंत्रित केले जातात, जे नियंत्रित क्षेत्रातून ट्रेनचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करते. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सिग्नलिंगची अशी सिस्टिम आहे, ज्यात इलेक्ट्रो-मॅकेनिकल अथवा पूर्वीपासूनच यूज होणारे पॅनल इंटरलॉकिंगची बरीच खासियत आहे.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कसे करत काम? -
जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या रूटवरून चालते, तेव्हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमच्या माध्यमाने ट्रेंड सेंसर्स तिचा वेग, स्थिती आणि इतर गोष्टींची माहिती मिळवते. ते इन्फॉर्मेशन सिग्नलिंग सिस्टिमला पाठविले जाते. यानंतर, सिग्नलिंग सिस्टिम अथवा त्या रेल्वेसाठी अचूक सिग्नल पाठवेल, यामुळे तिचा वेग, अडथळा आणि इतर सेंसर्स नियंत्रित केले जातात. ही प्रोसेस सातत्याने सुरू असते. यामुळे ट्रेन्सना योग्य प्रकारे सिग्नल्स मिळतात.