ओडिशात रेल्वे अधिकाऱ्यांचा मोठा निष्काळजीपणा! एकाच ट्रॅकवर आल्या 4 ट्रेन...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 08:17 PM2024-07-26T20:17:03+5:302024-07-26T20:17:03+5:30
यापूर्वी भुवनेश्वरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली होती.
Odisha Train Accident News : गेल्या काही दिवसांत देशातील विविध ठिकाणी रेल्वेअपघाताच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमधून रेल्वे कर्मचाऱ्यांनी धडा घेतल्याचे दिसत आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाची मोठी घटना समोर आली आहे. येथील लिंगराज स्टेशनवर एकाच ट्रॅकवर चार ट्रेन आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
या घटनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक ट्रेन रुळावर उभी असल्याचे दिसत आहे, तर तीन ट्रेन हळू हळू त्याच्या मागून येतात. आता रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, नुकतीच भुवनेश्वरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे.
यापूर्वी भुवनेश्वरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली होती. भुवनेश्वरमध्ये सकाळी आठच्या सुमारास मालगाडी रुळावरून घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
#WATCH | Odisha | Two wagons of a goods train derail near Bhubaneswar railway station; restoration work underway pic.twitter.com/ZDdNjUDE6l
— ANI (@ANI) July 26, 2024
तर, गेल्यावर्षी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 296 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 1200 लोक जखमी झाले होते. त्या अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून, केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने 7 जुलै रोजी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांनाही अटक केली. आता त्यांच्याविरुद्ध सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.