Odisha Train Accident: सलाम तुमच्या कार्याला.! ओडिशा रेल्वे अपघातानंतर रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 09:41 AM2023-06-03T09:41:00+5:302023-06-03T12:57:09+5:30

आपले रक्त देऊन ओडिशावासिय अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

Odisha Train Accident: Salute to work! Queue outside hospital to donate blood after Odisha train accident | Odisha Train Accident: सलाम तुमच्या कार्याला.! ओडिशा रेल्वे अपघातानंतर रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा

Odisha Train Accident: सलाम तुमच्या कार्याला.! ओडिशा रेल्वे अपघातानंतर रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा

googlenewsNext

बालासोर - ओडिशातील रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे तर ९०० हून अधिक जखमी आहेत. जखमी रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे. या जखमींचा जीव वाचवण्यासाठी ओडिशावासियांनी अत्यंत कौतुकास्पद कार्य सुरू केले आहे. जखमींना रक्ताची गरज असल्याने मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटलबाहेर रांगा लागल्या आहेत. 

आपले रक्त देऊन ओडिशावासिय अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या रेल्वे अपघातानंतर सरकारने आवाहन न करता स्वंयस्फूर्तीने लोकांनी रक्तदान करण्यासाठी हॉस्पिटल गाठले आहे. बालासोर येथे झालेल्या ट्रेन अपघातात ९०० हून अधिक जखमी आहेत. त्यांच्या उपचारासाठी रक्ताची गरज भासणार आहे. त्यासाठी ओडिशातील जनता बाहेर आली आहे. प्रत्येकाचा जीव वाचवायचा हा निर्धार त्यांनी केला आहे. या दुर्घटनेनंतर ओडिशातील हॉस्पिटलबाहेर रक्तदान करण्यासाठी आलेल्यांची रांग लागली आहे. 

एवढ्या संख्येने लोक इथे कसे आले हे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला. हे सर्व लोक केवळ रक्तदान करण्यासाठी आले आहेत असे त्यांना समजले. या लोकांना जखमींचे प्राण वाचवायचे आहेत. कठीण काळातही असे चित्र देशाला दिसल्याने जगात आजही माणुसकी आहे हेच यातून दिसते. 

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २०० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले. हे चित्र आनंद देणार आहे. 

Web Title: Odisha Train Accident: Salute to work! Queue outside hospital to donate blood after Odisha train accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.