Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील तिन्ही रेल्वेच्या चालकांचे काय झाले? समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 11:27 AM2023-06-05T11:27:34+5:302023-06-05T11:27:59+5:30

बहनगा बाजार स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता.

Odisha Train Accident: What happened to the drivers of the three trains in the Odisha train accident? The information came up | Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील तिन्ही रेल्वेच्या चालकांचे काय झाले? समोर आली माहिती

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील तिन्ही रेल्वेच्या चालकांचे काय झाले? समोर आली माहिती

googlenewsNext

बालासोर - ओडिशाच्या तिहेरी ट्रेन अपघाताने देशात हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण दुर्घटनेत २८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला तर ११०० प्रवासी जखमी झाले. या अपघाताचे कारण सिग्नल यंत्रणेतील त्रूट असल्याचे बोलले जात आहे. सध्या याचा तपास सुरू आहे. दुर्घटनेच्या ६२ तासांनंतर लोकांना या ट्रेनच्या ड्रायव्हरचे काय झाले हा प्रश्न पडला आहे. यात २ ट्रेनचे लोको पायलट आणि गार्ड जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी ओडिशाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर मालगाडीच्या इंजिन चालक, गार्ड अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. 

दक्षिण पूर्व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले की, कोरोमंडल एक्सप्रेसचे लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट आणि गार्डसह बंगळुरू हावडा एक्सप्रेसचे लोको पायलट, गार्ड यांचा जखमींच्या यादीत समावेश आहे. या सर्व जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ३ रेल्वे एकमेकांना धडकल्यानंतर रेल्वे बोर्डाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. लोको पायलटच्या हवाल्याने सिग्नल यंत्रणेतील गोंधळामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले आहे. 

सिग्नलमधील बिघाड ठरला अपघाताला जबाबदार
कोरोमंडल एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने सांगितले की, मला ग्रीन सिग्नल मिळाल्याने मी ट्रेन पुढे घेऊन गेलो. तर यशवंतपूर एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने अपघातापूर्वी अजब-गजब आवाज ऐकायला मिळाला असा दावा केला. या भीषण दुर्घटनेत कोरोमंडल ट्रेनचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. 

कसा झाला अपघात?
रेल्वेकडून सांगितले जात आहे की, ट्रेन नंबर १२४८१ कोरोमंडल एक्सप्रेस बहानगा बाजार स्टेशनजवळ मेनलाईनवरून जात होती. त्याचवेळी जी मालगाडी रुळावरून घसरली होती तिला जाऊन कोरोमंडल एक्सप्रेसने धडक दिली. ट्रेनचा वेग खूप जास्त असल्याने कोरोमंडल एक्सप्रेसचे २१ डबे रुळावरून घसरले आणि ३ डबे डाऊन लाइनवर गेले. प्रत्येक रेल्वे स्टेशनला दुसरी ट्रेन पास करण्यासाठी लूप लाइन असते. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. स्टेशनवरून दुसरी ट्रेन पास करावी लागते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते.

बहनगा बाजार स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीवर आदळल्याने हा अपघात झाला. दरम्यान, अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे मागचे दोन डबेही रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे १७१ किमी आणि खरगपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे १६६ किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळ हा अपघात झाला.

Web Title: Odisha Train Accident: What happened to the drivers of the three trains in the Odisha train accident? The information came up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.