Odisha Train Accident: कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 06:41 PM2023-06-06T18:41:25+5:302023-06-06T18:41:53+5:30

Coromandel Express Derail: रेल्वे विभागाने ट्रेन अपघातात ड्रायव्हरची चुकी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Odisha Train Accident: Why did the Coromandel Express take a loop line instead of going straight? | Odisha Train Accident: कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती...

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती...

googlenewsNext

Coromandel Train Accident: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या ओडिशा रेल्वे अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे. या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, यामुळे रेल्वे अपघाताचे कारण लवकर समोर येईल. मीडिया रिपोर्टनुसार, लूप लाईनवर इंटरलॉकिंग सिस्टीम बसवण्यात आली, ज्यामुळे हिरवा सिग्नल दिसला आणि ट्रेन तशीच पुढे धावली.

रिपोर्टनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेस सरळ जाणार होती, पण लूप लाईनवर इंटरलॉकिंग सिस्टीम असल्याने ही ट्रेन याय मार्गावर सरळ निघाली. या अहवालात गाड्यांच्या हालचालीसह संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. इंटरलॉकिंग सिस्टीम आणि सिग्नल्स बद्दल देखील माहिती या रिपोर्टमध्ये आहे.

इंटरलॉकिंग सिस्टीम कशी बिघडली?

सिग्नल हिरवा असूनही जर इंटरलॉकिंग सिस्टीम सिग्नलच्या अनुषंगाने नसून दुसऱ्या दिशेने असेल, तर याचा अर्थ येथे इंटरलॉकिंग सिस्टीम तुटलेली आहे. ही चूक कशी झाली? ही चूक काही तांत्रिक बिघाडामुळे झाली की, मानवी चूक होती की, षड्यंत्र होते? असे अनेक प्रश्न आहेत.

रेल्वेने काय म्हटले?
सिग्नलिंग यंत्रणेत ही चूक शक्य नसल्याचे रेल्वेचे मत आहे. सिग्नल वेगळे आणि इंटरलॉकिंग वेगळे असे याआधी कधीच दिसले नाही. ही यंत्रणा अतिशय मजबूत आहे. या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि पॉइंट मशीनमध्ये केलेल्या बदलांमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले होते.

एक्सप्रेस लूप लाइनमध्ये कशी गेली?
कोरोमंडल एक्स्प्रेसला मेन लाईनसाठी सिग्नल देण्यात आला होता, मात्र ही ट्रेन लूप लाईनवरच पुढे गेली आणि लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्याने रुळावरून घसरली. यादरम्यान, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाऊन मेन लाइनवरून जात असताना कोरोमंडलचे डबे त्यावर आदळले.

अपघातात 278 जणांचा मृत्यू 
ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी (2 जून) झालेल्या या अपघातात आतापर्यंत 278 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे बोर्डाने या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 
 

Web Title: Odisha Train Accident: Why did the Coromandel Express take a loop line instead of going straight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.