Odisha Train Accident: 'का अॅक्टिव्ह नव्हतं कवच सिस्टिम?' रेल्वे अपघाताच्या ठिकाणी CM ममता अन् रेल्वे मंत्री समोरा-समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 06:28 PM2023-06-03T18:28:44+5:302023-06-03T18:29:47+5:30
सीएम ममता बॅनर्जी अपघात स्थळाचा आढावा घेण्यासठी बालासोर येथे पोहोचल्या होत्या. यावेळी येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि गृहराज्य असल्याने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ओडिशातील बालासोर येथे जाऊन रेल्वे अपघातस्थळाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित केले. सीएम ममता यांनी माध्यमांशी संवाद साधताना जवळच उभ्या असलेल्या रेल्वेमंत्र्यांना, या मार्गावर कवच सिस्टिम का नव्हते असा प्रश्न विचारला.
सीएम ममता बॅनर्जी अपघात स्थळाचा आढावा घेण्यासठी बालासोर येथे पोहोचल्या होत्या. यावेळी येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि गृहराज्य असल्याने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानही उपस्थित होते. अश्विनी वैष्णव यांनी ममतांना रिसिव्ह केले आणि घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्यासोबत पाठविले.
यानंतर मीडियाला संबोधित करताना दोन्ही नेते एकत्र उभे होते. दरम्यान रेल्वेमंत्री आणि सीएम ममता यांच्यात किरकोळ शाब्दिक चकमकही झाली. माध्यमांसोबत बोलताना ममता म्हणाल्या, आपण ओडिशा सरकारसोबत समन्वयाने काम करत आहेत. आम्ही एक डॉक्टर आणि एक रुग्णवाहिकाही पाठवली आहे आणि यात अँटी कॉलीजन डिव्हाइस लावण्यात आलेले नव्हते.
'ज्यांनी आपला जीव गमावला...' -
ज्यांनी आपला जीव गमावला, ते परत मिळणार नाहीत, त्यामुळे आता बचाव कार्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ममता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधत म्हणाल्या, रेल्वेमध्ये समन्वयाचा अभाव आहे, कॅमेऱ्यासमोर रेल्वेमंत्री आणि ममता बॅनर्जी यांच्यात मृतांची आकडेवारी आणि बचाव कार्यासंदर्भात टोका-टोकीही झाली.
यावेळी, सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तीन बोगींमध्ये लोक अजूनही अडकलेले आहेत. याच वेळी, रेल्वेमंत्र्यांनी हे चूक असल्याचे सांगत, रेल्वेने बचाव कार्य पूर्ण केले असल्याचे सांगितले.