ओडिशातील अभियंत्याच्या घरावर छापा; संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले, 2.61 कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:52 PM2022-03-18T12:52:47+5:302022-03-18T13:34:48+5:30
Odisha : ओडिशाच्या दक्षता पथकाने (Vigilance team of Odisha) एका सहाय्यक अभियंत्याच्या घरावर छापा (Raid) टाकून बरीच मालमत्ता जप्त केली आहे. ही संपत्ती पाहून दक्षता पथकाचे अधिकारी चक्रावले आहेत.
नवी दिल्ली : साधारणपणे सहाय्यक अभियंत्याचा (Assistance engineer) पगार जवळपास 60 हजार रुपये असतो. पण एखाद्या अभियंत्याने इतक्या पगारातून करोडोंची संपत्ती कमावली तर त्याला काय म्हणायचे?... तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर ही धक्कादायक बाब ओडिशातील आहे. ओडिशाच्या दक्षता पथकाने (Vigilance team of Odisha) एका सहाय्यक अभियंत्याच्या घरावर छापा (Raid) टाकून बरीच मालमत्ता जप्त केली आहे. ही संपत्ती पाहून दक्षता पथकाचे अधिकारी चक्रावले आहेत.
सहायक अभियंता हा भद्रक जिल्ह्यातील ग्रामीण विभागात कार्यरत आहे. गुरुवारी दक्षता विभागाच्या 5 पथकांनी अभियंत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले असून ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या मोठ्या कारवाईत आतापर्यंत 2.61 कोटींची मालमत्ता जप्त केल्याचे वृत्त आहे. ओडिशातील सहाय्यक अभियंत्याच्या घरातून एवढी मोठी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, सहाय्यक अभियंत्याच्या दोन दुमजली इमारती, 16 भूखंड, बँक आणि विम्यासाठी 46.75 लाख रुपये जमा आणि 1.83 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
ओडिशा दक्षता संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, अभियंत्याकडून मोठ्या प्रमाणात सोने, रोख रक्कम आणि भूखंडाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आणि त्याला 4 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली. अहवालानुसार, बुधवारी कटक आणि खुर्दा जिल्ह्यात चार ठिकाणी छापे टाकण्यात आले ज्यात दक्षता संचालनालयाने 6.5 लाख रुपये रोख जप्त केले. यामध्ये फ्रिजमधील भाजीच्या ट्रेमधून 75,500 रुपये जप्त करण्यात आले. एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अभियंत्याजवळ कटक आणि भुवनेश्वरमधील महागड्या ठिकाणी सहा भूखंडाची कागदपत्रे आणि जवळपास 62 लाख रुपये किमतीचे 1.6 किलो सोने जप्त करण्यात आले.
Odisha | 5 teams of Odisha Vigilance raided the residence of an assistant engineer of rural works division in Bhadrak yesterday. Assets over Rs.2.61 crores including 2 double-storeyed buildings, 16 plots, bank & insurance deposits of Rs.46.75 lakh & cash Rs.1,83,416 were seized pic.twitter.com/lmOeUy3LNC
— ANI (@ANI) March 18, 2022
अभियंता आणि त्याच्या पत्नीला अटक
कटक येथील गंदरपूर येथील ड्रेनेज विभागात कार्यरत असलेले अभियंता मनोज बेहरा यांच्या अघोषित मालमत्तेची माहिती दक्षता विभागाला मिळाली होती, त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. बेहरा यांना 4.26 कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही, जे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोताच्या 508 टक्के होते. दरम्यान, याप्रकरणी बेहरा आणि त्याच्या पत्नीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.