शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह फोटो, फेसबुकवर केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 07:17 PM2017-08-04T19:17:55+5:302017-08-04T20:15:44+5:30
सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर एका शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेले फोटोंमुळे विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
नवी दिल्ली, दि. 4 - सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर एका शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेले फोटोंमुळे विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप शिक्षकाला अटक केलेली नाही.
ही प्रकार आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात असलेल्या काटलीचेरा येथील शाळेतील आहे. येथील स्थानिक DY-365 वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, फैजुद्दीन लष्कर असे या शिक्षकाचे नाव असून त्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत फोटोशूट केले. हे फोटोशूट करताना शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह फोटो काढले. या फोटोमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील स्पर्श केल्याचे दिसून येत आहे. तसेच, आक्षेपार्ह असे विद्यार्थिनींना मिठीत घेतल्याचे दिसते आहे.
फोटोशूट केल्यानंतर शिक्षकाने सर्व फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेले फोटो काही तासाभरात सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी यावर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांना आरोपी शिक्षकाची फक्त चौकशी केली आणि त्याला सोडून दिले. यामुळे विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी पोलीस अधिकारी शिक्षकाला पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या शिक्षकाने विद्यार्थिनींना काय सांगून या अशाप्रकारे फोटोशूट केले. याबद्दल अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. याचबरोबर, याआधीही या शिक्षकावर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.