हनुमानाला २.५ किलो सोन्याचा मुकुट अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:13 AM2019-07-16T04:13:46+5:302019-07-16T04:13:51+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्राताल (जिल्हा मुजफ्फरनगर) येथील भगवान हनुमानाला अडीच किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला.
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्राताल (जिल्हा मुजफ्फरनगर) येथील भगवान हनुमानाला अडीच किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला. रविवारी मुख्यमंत्री स्वामी कल्याण देव यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित होते तेव्हा त्यांनी मंदिराला भेट दिली. गंगा नदीच्या काठावर शुक्राताल येथे हनुमानाची ७५ फूट उंचीची मूर्ती आहे. या भागात १० कोटी रुपये खर्चाच्या वेगवेगळ्या विकासकामांची पायाभरणी त्यांनी केली. गेल्या वर्षी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमानाबाबत म्हटले होते की, बजरंग बलीने संपूर्ण भारत जोडण्याचे काम केले. (वृत्तसंस्था)