३४ हजार शहीद पोलिसांचे राष्ट्रीय स्मारक देशाला अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:46 AM2018-10-22T04:46:43+5:302018-10-22T04:46:58+5:30
केंद्र सरकारने उभारलेले राष्ट्रीय पोलीस स्मारक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले.
नवी दिल्ली: स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कर्तव्य बजावत असताना देशासाठी प्राणाहुती दिलेल्या केंद्रीय व राज्यांच्या पोलीस दलांमधील ३४,८४४ कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने उभारलेले राष्ट्रीय पोलीस स्मारक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले.
सन १९५९ मध्ये लडाखमध्ये हॉट स्प्रिंग येथे आक्रमक चिनी सैनिकांशी दोन हात करताना बलिदान दिलेल्या पोलिसांच्या स्मृत्यर्थ २१ आॅक्टोबर हा दिवस दरवर्षी देशभर पौलीस शौर्य दिवस म्हणून पाळला जातो. त्याचे औचित्य साधून पंतप्रधानांनी या राष्ट्रीय स्मारकाचे उद््घाटन केले. मोदींनी पुष्पचक्र वाहून शहिदांना आदंरांजली दिली व हॉट स्प्रिंग घटनेतील जिवंत पोलिसांचा सत्कारही केला.
या वेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी कायदा व सुव्यवस्था राखताना, दहशतवाद्यांशी मुकाबला करताना व देशाचे रक्षण करताना प्राणांीच आहुती देणाºया बहाद्दर पोलिसांच्या शौर्याचे व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. हे राष्ट्रीय स्मारक देशभरातील पोलीस दलांची यशोगाथा चिरंतन ठेवेल व भावी पिढ्यांना स्फूर्ती देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.