सिंधू साधना जहाज राष्ट्रास अर्पण

By Admin | Published: July 13, 2014 01:25 AM2014-07-13T01:25:37+5:302014-07-13T01:25:37+5:30

देशात सत्ताबदल झाल्यानंतर संशोधनासाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे.

Offering the ship to the Sindhu Sadhana ship | सिंधू साधना जहाज राष्ट्रास अर्पण

सिंधू साधना जहाज राष्ट्रास अर्पण

googlenewsNext
पणजी : देशात सत्ताबदल झाल्यानंतर संशोधनासाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. आपल्याकडे अधिकाधिक वैज्ञानिक तयार व्हायचे असतील तर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्यासाठी विज्ञान व संशोधनासंबंधी सातत्याने कार्यशाळा होणो गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी शनिवारी केले.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने बांधलेल्या आर. व्ही. सिंधू साधना या समुद्र संशोधन जहाजाचे शनिवारी राष्ट्रार्पण करण्यात आले. त्यानिमित्त वास्को येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. सिंग बोलत होते. अन्न, ऊर्जा, खनिज, पर्यावरण यावर होणारे परिणाम आणि हवामान बदल याविषयी संशोधन करणारी सिंधू साधना हे पहिले देशी बनावटीचे जहाज आहे. सिंग यांच्या हस्तेच हे जहाज राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
2क्23 र्पयत भारत देश जगात महासत्ता बनायला हवा. त्यासाठी संशोधनाच्या क्षेत्रतील साधनसुविधा अधिक मजबूत होण्याची गरज आहे. विद्याथ्र्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने प्रयत्न करायला हवेत, असेही सिंग म्हणाले.  (खास प्रतिनिधी)
 
सिंधू साधनाविषयी..
या बहुउद्देशीय संशोधक जहाजाची लांबी 8क् मीटर असून, ते 17.6 मीटर रुंद आहे. या जहाजावर 57 कर्मचारी राहू शकतात, ज्यात 29 शास्त्रज्ञ व 28 कर्मचारी असतील. या जहाजाचा वेग 13.5 नॉट्स प्रतितास असून,समुद्रात सलग 45 दिवस राहू शकते. अत्याधुनिक उपकरणो असलेल्या व सर्व  माहितीचा साठा (डेटा) व नमुने असलेल्या 1क् प्रयोगशाळा या जहाजावर आहेत. इको साऊंडर्स, पॅरासाऊंड वॉटर कॉलम, सब बॉटम प्रोफाईलर्स, ग्रेवीमीटर, मॅग्नोटोमीटर, हवामान केंद्र, एअर क्वालिटी मोनिटर्स आदी उपकरणो या  जहाजात बसविण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार आणखी उपकरणो बसविण्याची सुविधा या जहाजावर असून, पाण्यातील अथवा पाण्याखालील कोणतीही नौका वर खेचण्याची यंत्रणाही बसविण्यात आली आहे.

 

Web Title: Offering the ship to the Sindhu Sadhana ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.