आपच्या 27 आमदारांना दिलासा; लाभाचे पद प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीन चीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 01:56 PM2018-10-25T13:56:16+5:302018-10-25T13:57:51+5:30
लाभाचे पद स्वीकारल्याच्या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुरुवारी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना क्लीन चीट दिली आहे.
नवी दिल्ली : लाभाचे पद स्वीकारल्याच्या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुरुवारी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना क्लीन चीट दिली आहे.
रोगी कल्याण समितीशी निगडीत हे प्रकरण आहे. आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांकडे वेगवेगळ्या रुग्णांलयामधील रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्षपद होते. याप्रकरणी विभोर आनंद यांने आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने हा लाभाच्या पदाचा आरोप फेटाळून लावला आहे.
Election Commission gives clean chit to 27 AAP MLAs in office-of-profit for the post of chairman of Rogi Kalyan Samiti case
— ANI (@ANI) October 25, 2018
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही निवडणूक आयोगाच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांवर सदस्यत्व रद्द होण्याची नामुष्की टळली आहे.