्नरोहयोवरून अधिकारी धारेवर दीपक केसरकर: आठ दिवसात अहवाल द्या

By admin | Published: December 20, 2015 12:51 AM2015-12-20T00:51:54+5:302015-12-20T00:51:54+5:30

जळगाव : रोजगार हमीच्या कामांबाबत या जिल्‘ात अतिशय लज्जास्पद काम असून याप्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तातडीने बैठक घेऊन आठ दिवसात कामांच्या नियोजनाचा अहवाल पाठवावा असे स्पष्ट आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.

The Officer on Lords Deepak Kesarkar: Report in eight days | ्नरोहयोवरून अधिकारी धारेवर दीपक केसरकर: आठ दिवसात अहवाल द्या

्नरोहयोवरून अधिकारी धारेवर दीपक केसरकर: आठ दिवसात अहवाल द्या

Next
गाव : रोजगार हमीच्या कामांबाबत या जिल्‘ात अतिशय लज्जास्पद काम असून याप्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तातडीने बैठक घेऊन आठ दिवसात कामांच्या नियोजनाचा अहवाल पाठवावा असे स्पष्ट आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
शिवसेनेच्या आमदारांनी जिल्‘ातील विविध भागात भेट दिल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. तीत हे आदेश देण्यात आले. जिल्‘ातील दुष्काळी स्थिती, राबवावयाच्या योजना, पाणी योजना, विजेचे प्रश्न, विहिरी वाटपाबाबतच्या तक्रारी, सेसची वसुली आदींबाबत उपस्थित आमदारांनी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पाण्डे यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी मांडल्या.
-------
इन्फो
उद्धव ठाकरे आज शहरात
उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रविवार, २० रोजी जळगाव जिल्‘ाच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्यासोबत सेनेचे सात मंत्रीही असतील. रविवारी सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे हे तालुक्यांचा दौरा करुन आलेल्या आमदारांकडून आढावा घेतील. त्यानंतर सागर पार्क मैदानावर आत्महत्याग्रस्त २२३ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दहा हजाराची मदत त्यांच्याहस्ते दिली जाईल. ती दिल्यानंतर दुपारी १२ वाजता याच ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडे खान्देशवासीयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: The Officer on Lords Deepak Kesarkar: Report in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.