अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची खेचली साडी, दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 12:25 PM2017-08-18T12:25:44+5:302017-08-18T14:17:45+5:30

दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

The official said the incident took place in a five star hotel in Delhi's Five Star Hotel | अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची खेचली साडी, दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील घटना

अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची खेचली साडी, दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील घटना

Next
ठळक मुद्देलैंगिक जबरदस्तीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.हॉटेलचा सुरक्षा व्यवस्थापक पवन दहीया मागच्या अनेक दिवसांपासून या महिलेवर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता.

नवी दिल्ली, दि. 18 - दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक जबरदस्तीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. महत्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पीडित महिलेने तक्रार केली म्हणून तिलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. 

ही घटना 29 जुलैला दिल्लीच्या प्राईड प्लाजा हॉटेलमध्ये घडली. 33 वर्षीय पीडित महिला मागच्या दोनवर्षांपासून हॉटेलच्या गेस्ट रिलेशन सेक्शनमध्ये नोकरी करत होती. हॉटेलचा सुरक्षा व्यवस्थापक पवन दहीया मागच्या अनेक दिवसांपासून या महिलेवर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. 29 जुलैला त्याने पीडित महिलेला त्याच्या रुममध्ये बोलवले तिथे त्याने साडी खेचून महिलेला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान पवनच्या रुममध्ये एक व्यक्ती आली हीच संधी साधून पीडित महिला तिथून बाहेर पडली. 


आणखी वाचा 
चिनी मोबाइल कंपन्यांची डाटाचोरी रोखण्यासाठी मोदी सरकारने आखला प्लान
भारताला पाठिंबा देऊन जपानची चीनला सणसणीत चपराक

ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पीडित महिलेचा वाढदिवस होता. महिला तिची दोनची शिफ्ट संपवून घरी जायला निघाली तेव्हा पवनने तिचा पाठलाग करुन दोनवेळा तिला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने एचआर विभागाकडे घडलेल्या घटनेची तक्रार केली. पण कुठलीही कारवाई झाली नाही. 

अखेर नव-याच्या सल्ल्यावरुन तिने एक ऑगस्टला पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला. पीडित महिलेने घटनेचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना दिल्यानंतर दोन आठवडयांनी तिला हॉटेलकडून नोकरीवरुन कमी करण्यात आल्याचे पत्र मिळाले. ज्या सहका-याने पीडित महिलेला सीसीटीव्ही फुटेज मिळवून द्यायला मदत केली त्याला सुद्धा नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. दहीयाने अनेकदा माझ्यावर शरीरसंबंधासाठी दबाव टाकला असा या महिलेने आरोप केला. 

बलात्काराला विरोध करणा-या तरुणीला विवस्त्र अवस्थेत चौथ्या मजल्यावरुन फेकले
मागच्या आठवडयात दिल्लीमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्नात तिला विवस्त्र अवस्थेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य  आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.


Web Title: The official said the incident took place in a five star hotel in Delhi's Five Star Hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.