महाराष्ट्र, गोव्याच्या ८ जिल्ह्यांत मोदी पाठवणार अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 01:36 AM2018-10-28T01:36:37+5:302018-10-28T06:33:58+5:30

निवडणुकांच्या आधी योजनांना गती देण्यासाठी तसेच सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रातील (एमएसएमई) क्लस्टर्सच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातील ८ जिल्ह्यांत अतिरिक्त सचिव व संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी पाठवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

Officials who will send Modi to 8 districts of Maharashtra, Goa | महाराष्ट्र, गोव्याच्या ८ जिल्ह्यांत मोदी पाठवणार अधिकारी

महाराष्ट्र, गोव्याच्या ८ जिल्ह्यांत मोदी पाठवणार अधिकारी

Next

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : निवडणुकांच्या आधी योजनांना गती देण्यासाठी तसेच सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रातील (एमएसएमई) क्लस्टर्सच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातील ८ जिल्ह्यांत अतिरिक्त सचिव व संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी पाठवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

हे अधिकारी पुणे, नाशिक, धुळे, सांगली, नागपूर, औरंगाबाद, ठाणे आणि उत्तर गोवा या जिल्ह्यांत जातील. देशात ७५0 केंद्रीय अधिकारी पाठविण्याची मोदींची योजना आहे. ११५ जिल्ह्यांतील ४५ हजार गावांत ७ सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर हे अधिकारी देखरेख ठेवतील. एक अधिकारी ७५ गावांवर देखरेख करील. चार ते सात दिवसांत तो किमान तीन गावांना भेट देईल. हे अधिकारी संयुक्त अथवा अतिरिक्त सचिव दर्जाचे असतील. याशिवाय ३२२ संचालक, उपसचिव, ३२२ अवर सचिव दर्जाचे अधिकारी नोडल आॅफिसर म्हणून काम करतील. पहिल्या टप्प्यात ८0 अधिकाऱ्यांची निवड करण्यात येत आहे. ८0 जिल्ह्यांत एमएसएमईसाठी सरकार पॅकेज घोषित करणार आहे. एमएसएमई क्षेत्रात ६ कोटी उद्योग असून १२0 दशलक्ष लोकांना रोजगार दिला जातो. मोदींनी पाठविलेले अधिकारी बँका, ईपीएफओ, ईसीआयएस, एसआयडीबीआय या संस्थांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करतील.

Web Title: Officials who will send Modi to 8 districts of Maharashtra, Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.