अरे बापरे ! घरात आढळले तब्बल 186 साप
By admin | Published: May 11, 2016 11:56 AM2016-05-11T11:56:19+5:302016-05-11T11:56:19+5:30
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात एका घरात एक, दोन नाही तर तब्बल 146 साप आढळले आहेत
Next
ऑनलाइन लोकमत -
लखनऊ, दि. 11 - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर जिल्ह्यात एका घरात एक, दोन नाही तर तब्बल 146 साप आढळले आहेत. 40 वर्ष जुन्या घरात हे साप वास्तव्य करत होते मात्र याची कोणालाच कल्पना नव्हती. या सापांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आलं आहे.
निवृत्त वनअधिकारी जितेंद्र मिश्रा आपल्या कुटुंबासोबत या घरात राहतात. बागीया परिसरात हे घर आहे. रविवारी रात्री जेव्हा सर्वजण झोपले होते तेव्हा फुत्काराच्या आवाजाने सर्वांना जाग आली. जितेंद्र मिश्रा यांना त्यावेळी खोलीच्या एका कोप-यात दोन साप दिसले. त्यांनी शेजारी आणि जवळच राहणा-या नातेवाईकांना बोलावून सापांना पकडलं आणि एका बॉक्समध्ये बंद केलं. त्यानंतर खोलीत अजून साप आले.
यानंतर मात्र मिश्रा कुटुंबीय घाबरले. संपुर्ण रात्र त्यांनी शेजा-यांच्या घरी काढली आणि सोमवारी सकाळी स्थानिक तांत्रिक रामचंद्र याला बोलावलं. घरामधील एका भिंतीखाली बेसमेंट असल्याची माहिती रामचंद्रने दिली. भिंत तोडण्यास सुरुवात केल्यानंतर साप बाहेर येण्यास सुरुवात झाली. 'सापांना कोणत्याही प्रकारची इजा न करता एका बॉक्समध्ये बंद करुन दूर जंगलात सोडण्यात आलं', अशी माहिती जितेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.
More than 150 snakes were found in a house in UP's Lakhimpur Kheri distt, later released in forest area (08/05/16) pic.twitter.com/ji5cawKh6c
— ANI UP (@ANINewsUP) May 11, 2016
Snakes entered from a basement under one wall of the house late night: RK Rai, Deputy Inspector pic.twitter.com/e1I7RTjwT7
— ANI UP (@ANINewsUP) May 11, 2016