अरे बापरे ! 4 वर्षाच्या चिमुरडीला मिळाला नववी इयत्तेत प्रवेश
By admin | Published: August 23, 2016 10:47 AM2016-08-23T10:47:51+5:302016-08-23T10:47:51+5:30
अनन्या वर्मा असं या चार वर्षीय चिमुरडीचं नाव असून शिक्षण विभागाने संमती दिल्यानंतर तिला नववी इयत्तेत प्रवेश देण्यात आला आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 23 - तिने वयाची पाच वर्षही अजून पुर्ण केलेली नाहीत आणि लिम्का बूक ऑफ रेकॉर्समध्ये नाव नोंदवण्याची तयारीही सुरु झाली आहे. अनन्या वर्मा असं या चार वर्षीय चिमुरडीचं नाव असून शिक्षण विभागाने संमती दिल्यानंतर तिला नववी इयत्तेत प्रवेश देण्यात आला आहे. लखनऊमधील शाळेत तिला प्रवेश देण्यात आला असून तिचं वय 4 वर्ष, 8 महिने आणि 21 दिवस आहे.
दीड ते दोन वर्षात अनन्या बोर्ड परिक्षा देईल, आणि जर तिने ती यशस्वीरित्या पार केली तर अनन्या आपल्याच बहिणीचा रेकॉर्ड तोडेल. अनन्याची बहिण सुषमा वर्मा हिने सात वर्षाची असताना 2007 मध्ये बोर्डाची परिक्षा दिली होती आणि पासदेखील झाली होती. दोन्ही बहिणी सेंट मीरा इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.
'अनन्या इतकी हुशार आहे की तिला नववीत प्रवेश घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अनन्या स्पष्ट हिंदी बोलते तसंच नववीची पुस्तकेही न अडखळता वाचते', असं शिक्षण अधिकारी उमेश त्रिपाठी यांनी सांगितलं आहे.