अरे बापरे ! सिगारेट ओढण्यावर खर्च होतात 1 कोटी रुपये
By admin | Published: May 30, 2016 12:44 PM2016-05-30T12:44:09+5:302016-05-30T12:47:20+5:30
एखादी 30 वर्षीय व्यक्ती दिवसाला 5 सिगारेट ओढत असेल तर 60 व्या वयापर्यंत त्या व्यक्तीने सिगारेटवर 1 कोटी रुपये खर्च केलेले असतात
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 30 - सिगारेटच्या पाकिटावर असणा-या धोक्याच्या सुचना वाचूनदेखील तुम्ही धुम्रपान करत असाल तर मग हे नक्की वाचा. एकीकडे धुम्रपानामुळे शारिरीक नुकसान होत असताना याचा भार तुमच्या खिशावरदेखील तितक्याच प्रमाणात पडत आहे. सिगारेटमुळे तुम्ही तब्बल 1 कोटी रुपये हवेत उडवून देता.
एखादी 30 वर्षीय व्यक्ती दिवसाला 5 सिगारेट ओढत असेल तर 60 व्या वयापर्यंत त्या व्यक्तीने सिगारेटवर 1 कोटी रुपये खर्च केलेले असतात. हे 1 कोटी तुम्ही नेमके कसे खर्च करता जाणून घेऊया -
सिगारेट विकत घेण्याचा खर्च -
एका सिगारेटची किंमत असते 10 ते 15 रुपये. आपण एका सिगारेटची किंमत 12 रुपये आहे असं ग्राह्य धरु. एका दिवसामध्ये 5 सिगारेट ओढण्याचा खर्च 60 रुपये म्हणजे महिन्याला 1800 रुपये. याप्रकारे 30 वर्षात सिगारेट विकत घेण्यावर तुम्ही 24.47 लाख रुपये खर्च करता. सिगारेटवर खर्च करण्याऐवजी है पैसे तुम्ही गुंतवलेत तर 9 टक्के व्याजावर 30 वर्षात 69.23 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा असतील.
उपचार खर्च -
धुम्रपानाचा परिणाम आपल्या शरिरावर मोठ्या प्रमाणात होता. जास्त प्रमाणात सिगारेट ओढणा-यांना अनेकवेळा श्वसनाशी निगडीत आजार होतात. तसंच कॅन्सर आणि ह्रद्यविकाराच्या आजाराची शक्यताही वाढलेली असते. उपचारावर प्रत्येक महिन्यात किमान 400 रुपये खर्च केले जातात याचा अर्थ 30 वर्षात तुम्ही 11.59 लाख रुपये खर्च करता.
महागडा इन्श्युरन्स -
इन्श्युरन्स देणा-या कंपन्या सिगारेट ओढणा-या व्यक्तींना हाय रिस्क कॅटॅगरीमध्ये टाकतात. त्यामुळे त्यांचा प्रिमिअमदेखील (हफ्ता) जास्त असतो. 30 वर्षांसाठी 1 कोटींची जीवन वीमा योजना असेल तर त्या व्यक्तीला महिन्याला 460 रुपयांचा ज्यादा प्रिमिअम भरावा लागतो. याप्रकारे 30 वर्षात 1.65लाख रुपये ज्यादा भरावे लागतात.
कुटुंबाचं आरोग्य -
जर तुम्ही सिगारेट ओढत असाल तर याचा परिणाम तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यावरदेखील होत असतो. सिगारेटचा सर्वात जास्त फटका लहान मुलांना बसतो, ते आजारी पडण्याची संभावना जास्त असते. त्यांची तब्बेत बिघडल्यास खर्च अजून वाढतो. हा सर्व खर्च पाहता फक्त धुम्रपानाच्या सवयीमुळे तुम्ही 30 वर्षात 1 कोटींहून जास्त खर्च करता.