अरे बापरे ! पाच वर्षाच्या मुलाने वर्षभरापुर्वी गिळलेला टुथब्रश ऑपरेशन करुन काढला बाहेर

By admin | Published: May 2, 2016 12:53 PM2016-05-02T12:53:32+5:302016-05-02T12:53:32+5:30

पाच वर्षाच्या मुलाने वर्षभरापुर्वी टुथब्रश गिळला होता पण आई ओरडेल या भीतीने त्याने टुथब्रश गिळल्याचं कोणाला सांगितलच नाही

Oh dear! A five-year-old boy was taken out of a toothbrush by swallowing a year ago | अरे बापरे ! पाच वर्षाच्या मुलाने वर्षभरापुर्वी गिळलेला टुथब्रश ऑपरेशन करुन काढला बाहेर

अरे बापरे ! पाच वर्षाच्या मुलाने वर्षभरापुर्वी गिळलेला टुथब्रश ऑपरेशन करुन काढला बाहेर

Next
>ऑनलाइन लोकमत - 
रायपूर, दि. 02 - लहान मुलांकडे लक्ष नसेल आणि जर ते तुम्हाला काही सांगण्यास घाबरत असतील तर त्याचा काय गंभीर परिणाम होऊ शकतो हे रायपूरमधील घटनेतून समोर आलं आहे. पाच वर्षाच्या मुलाने वर्षभरापुर्वी टुथब्रश गिळला होता पण आई ओरडेल या भीतीने त्याने टुथब्रश गिळल्याचं कोणाला सांगितलच नाही. आपल्या मुलाने टुथब्रश गिळल्याचं त्याच्या घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. सहा महिन्यापुर्वी जेवताना आणि लघवी करताना त्रास होऊ लागल्यानंतर अखेर ही गोष्ट लक्षात आली. केशव साहू असं या मुलाचं नाव आहे. अखेर कुटुंबियांनी रायपूर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरकडे धाव घेतली. ऑपरेशन करुन टुथब्रश बाहेर काढण्यात आला आहे.
 
'टुथब्रश गिळल्याने केशवला मुतखड्याचा त्रास होऊ लागला. आम्ही 5 सेंमी मुतखडा बाहेर काढला होता. मात्र त्याच्यासोबत असणारी वस्तू नेमकी काय होती हे एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंडमध्ये स्पष्ट होत नव्हतं. मुत्रपिंडातून मुतखडा बाहेर काढला तेव्हा त्याच्यासोबत 15सेंमी मोठी काठीदेखील बाहेर आली होती. रक्ताने माखली असल्याने ते नेमकं काय आहे ? याची माहिती नव्हती. पण नंतर तो टुथब्रश असल्याचं समोर आलं', अशी माहिती रायपूर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर जे पटेल यांनी दिली आहे.
केशवला आपण टुथब्रश कधी गिळला हे लक्षात नाही. 'लहान मुलं नाणं गिळत असल्याची अनेक प्रकरण आली आहेत मात्र हे एक विलक्षण प्रकरण आहे. टुथब्रशमुळे केशवच्या आतड्याला तीन ठिकाणी भोक पडली असून त्यानंतर ते मुत्रपिंडात गेले.अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये लगेच उपचार करण्यात आले नाही तर जगण्याची शक्यता फार कमी असते. मात्र केशवच्या बाबतीच हा चमत्कारच म्हणावा लागेल', असं डॉक्टर जे पटेल यांनी म्हटलं आहे.
 
केशवचं ऑपरेशन यशस्विरित्या पार पडलं असून सध्या त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आलं आहे. पण जोपर्यंत त्यांची आतड्याची जखम आणि मुत्रपिंड व्यवस्थित होत नाही तोपर्यंत त्याला दररोज हॉस्पिटमलमध्ये चेकअपसाठी जावं लागणार आहे. 
 

Web Title: Oh dear! A five-year-old boy was taken out of a toothbrush by swallowing a year ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.