अरे बापरे ! व्हिडिओ काढण्यासाठी गंगेत उडी मारली आणि बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 01:17 PM2016-07-08T13:17:59+5:302016-07-08T13:17:59+5:30

मित्रांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्यासाठी गंगेत उडी मारायला सांगितल्यानंतर उडी मारलेला तरुण बेपत्ता झाला आहे

Oh dear! Jumped into Ganges to remove the video and swept it | अरे बापरे ! व्हिडिओ काढण्यासाठी गंगेत उडी मारली आणि बुडाला

अरे बापरे ! व्हिडिओ काढण्यासाठी गंगेत उडी मारली आणि बुडाला

Next
>ऑनलाइन लोकमत - 
देहरादून, दि. 08 - मित्रांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्यासाठी गंगेत उडी मारायला सांगितल्यानंतर उडी मारलेला तरुण बेपत्ता झाला आहे. हरिद्वारजवळ ही घटना घडली आहे. आशिष गंगेत बुडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 
 
मोबाईलवर नाटकी व्हिडिओ शूट करण्यासाठी मित्रांनी 27 वर्षीय आशिष चौहानला गंगेत उडी मारण्यासाठी सांगितलं. दारु प्यायलेला आशिष सुरुवातीला उडी मारण्यासाठी तयार नव्हता. पण नंतर मित्रांनी जास्त जबरदस्ती केल्यावर आशिषने उडी मारली. मात्र वाहत्या पाण्यात त्याचा टिकाव लागला नाही आणि काही वेळातच तो बुडाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मित्रांनी हे सर्व मोबाईल शूट केलं असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 
 
आशिषला बुडून 48 तास झाले आहेत, मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. आशिष त्याचे मित्र आश्विनी चौहान आणि बलराज कुमार यांच्यासोबत दारु प्यायला बसला होता. त्यानंतर त्यांनी पोहायला जायचं , आणि हे सगळं मोबाईलमध्ये शूटही करायचं ठरवलं. आशिष चौहानने उडी मारल्यानंतर खुप वेळ झाला तरी तो दिसत नसल्याचं पाहून मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र खूप वेळ झाल्यानंतरही आशिष न दिसल्याने मित्रांनी पोलीस स्टेशन गाठलं. 
 
पोलिसांनी बचावकार्य पथकासोबत आशिषचा शोध घेतला, पण 48 तासानंतरही आशिषचा शोध लागलेला नाही. आशिष चौहानच्या कुटुंबाने कोणत्याही प्रकारची तक्रार पोलिसांत केलेली नाही. आशिषच्या मृत्यूला आम्ही कोणालाही जबाबदार मानत नाही असं त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना पत्रातून सांगितलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

Web Title: Oh dear! Jumped into Ganges to remove the video and swept it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.