अरे बापरे ! पाणीपुरी चविष्ट बनवण्यासाठी वापरायचा टॉयलेट क्लिनर

By admin | Published: February 6, 2017 03:36 PM2017-02-06T15:36:09+5:302017-02-06T15:36:09+5:30

पाणीपुरी चविष्ट बनवण्यासाठी पाण्यात टॉयलेट क्लिनर मिसळणा-या पाणीपुरीवाल्याला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे

Oh dear! Toilet cleaner used for making water puri | अरे बापरे ! पाणीपुरी चविष्ट बनवण्यासाठी वापरायचा टॉयलेट क्लिनर

अरे बापरे ! पाणीपुरी चविष्ट बनवण्यासाठी वापरायचा टॉयलेट क्लिनर

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 6 - पाणीपुरी चविष्ट बनवण्यासाठी पाण्यात टॉयलेट क्लिनर मिसळणा-या पाणीपुरीवाल्याला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे 2009 मधील प्रकरण आहे. अहमदाबादमधील लाल दरवाजा परिसरात एक पाणीपुरीवाला पाणीपुरी चविष्ट लागावी यासाठी पाण्यात टॉयलेट क्लिनर मिसळायचा. 
 
अहमबदाबाद महानगरपालिकेकडे हा पाणीपुरीवाला पाण्यात काहीतरी मिसळत असल्याची तक्रार आली होती. आपलं पाणीपुरीचं दुकान तो एका गटराजवळ लावत असून, फेकत असलेल्या पाणी आणि पाणीपुरीमुळे रस्ता खराब होत असल्याचंही तक्रारीत सांगण्यात आलं होतं. यानंतर महापालिकेने कारवाई करत नमुने घेऊन चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवले. 
 
रिपोर्ट आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पाणीपुरीमधील पाण्यात अॅसिड सापडलं जे टॉयलेट क्लिनरमध्ये वापरलं जातं. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर विशेष न्यायालयाने पाणीपुरी विक्रेता चेतन नानजी याच्याविरोधात भेसळ केल्याचा गुन्हा दाखल केला. दोष सिद्ध झाल्यानंतर त्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 
 
सुनावणीदरम्यान चेतन नानजी याने आपल्याविरोधात पुरावे नसून सोडून देण्यात यावे असा दावा केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर दोषी चेतनला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. 
 

Web Title: Oh dear! Toilet cleaner used for making water puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.