अरे देवा! त्याने बारावीच्या पेपरात लिहिली पॉर्नकथा
By admin | Published: June 8, 2017 06:52 PM2017-06-08T18:52:32+5:302017-06-08T18:52:32+5:30
गुजरातमधील एका विद्यार्थ्याने 12वीच्या केमेस्ट्रीच्या पेपरात लिहिलेली भलतीच केमेस्ट्री वाचून
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 8 - पास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत देवाचे नाव, मंत्र किंवा पेपर तपासणाऱ्या शिक्षकाला पास करण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहिल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पेपर तपासणारे शिक्षकही विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या हटके उत्तरांच्या गमतीजमती सांगत असतात. पण गुजरातमधील एका विद्यार्थ्याने 12वीच्या केमेस्ट्रीच्या पेपरात जे काही लिहिले ते वाचून पेपर तपारणाऱ्या शिक्षिकेला 440 व्होल्टचा धक्काच बसला.
गुजरातमधील 12वीच्या केमेस्ट्रीच्या पेपरात एका विद्यार्थ्याने प्रश्नांची उत्तरे म्हणून विविध विषयांवरच्या पॉर्नकथा लिहिल्या. हा पेपर तपारण्यासाठी जेव्हा एका महिला शिक्षिकेकडे गेला तेव्हा केमेस्ट्रीच्या पेपरात लिहिलेली भलतीच केमेस्ट्री वाचून तिला धक्का बसला. तिने या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे केली. त्यानंतर या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेपरात पॉर्नकथा लिहिणाऱ्या या अवली विद्यार्थ्याला परीक्षा रिफॉर्म्स समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तो हजर राहिला नाही. या प्रकाराबाबत गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे चेअरमन ए.जे. शहा यांनी सांगितले की," या विद्यार्थ्याचा निकाल रद्द करण्यात आला असून, त्याच्यावर परीक्षा देण्यास एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे."
परीक्षा मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च्या विविध व्यक्तिसोबतच्या पॉर्नकथा लिहिल्या होत्या. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्याला केमेस्ट्रीमध्ये भोपळा मिळालाच पण इतर विषयांतही तो नापास झाला.