‘अरे यार’ आता आॅक्सफर्ड शब्दकोशात
By admin | Published: June 27, 2015 02:39 AM2015-06-27T02:39:58+5:302015-06-27T02:39:58+5:30
भारतीयांच्या तोंडून सहज बाहेर पडणारा ‘अरे यार’ हा शब्द आता केवळ भारतीय राहिलेला नाही; त्याने आॅक्स्फर्ड इंग्रजी शब्दकोशात स्थान पटकावले आहे.
कोलकाता : भारतीयांच्या तोंडून सहज बाहेर पडणारा ‘अरे यार’ हा शब्द आता केवळ भारतीय राहिलेला नाही; त्याने आॅक्स्फर्ड इंग्रजी शब्दकोशात स्थान पटकावले आहे. चुडीदार, भेळपुरी आणि ढाबा यासारखे खास भारतीय देशी शब्दही आॅक्सफर्डच्या शब्दपंक्तीत जाऊन बसणार आहेत.
खरेतर हे शब्द इंग्रजी बोलणाऱ्यांसाठी दुर्मीळ नाहीतच. भाषा संशोधनाची व्यापकता वाढत असून, त्यात या शब्दांच्या वापराचे पुरेसे पुरावे मिळाले आहेत. क्वचितच का होईना, पण नियमितपणे हे शब्द इंग्रजीत वापरले जातात. त्यामागे विशिष्ट संस्कृती आणि इतिहास असून, भाषिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. ‘अरे यार’ शब्दाचा इतिहासही पूर्वापार चालत आला आहे. १८४५ मध्ये या शब्दाचा उल्लेख झाल्याचे आढळते, असे आॅक्सफर्ड शब्दकोशाचे सल्लागार संपादक डॉ. डॅनिका सलझार यांनी म्हटले आहे.