अरे व्वा ! आता 'वेब व्हॉट्स अॅप'वरुनही करा फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड
By admin | Published: October 18, 2016 02:39 PM2016-10-18T14:39:43+5:302016-10-18T16:23:14+5:30
व्हॉट्सअॅपवर आलेला फोटो, व्हिडीओ, ऑडिओ फाईल मोबाईलवरुन फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. मात्र आता हीच सुविधा व्हॉट्सअॅप वेब वापरतानाही मिळणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - व्हॉट्स अॅपवर आलेला फोटो, व्हिडीओ, ऑडिओ फाईल मोबाईलवरुन फॉरवर्ड करण्याची सुविधा आहे. मात्र आता हीच सुविधा 'वेब व्हॉट्स अॅप' वापरतानाही उपलब्ध झाली आहे. याधी 'वेब व्हॉट्स अॅप' वापरताना एखादा फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करायचा असेल तर ती फाईल डाऊनलोड करावी लागत असे, त्यानंतर ती सेव्ह झाली असेल तिथून शोधा आणि मग अटॅच करुन फॉरवर्ड करता येऊ शकत होतं. मात्र आता फाईल डाऊनलोड न करता तशीच फॉरवर्ड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
मेसेज किंवा एखादी फाईल फॉरवर्ड करायची असेल तर त्या फाईलच्या डाव्या बाजूला एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊन मेन्यू येईल. त्यामध्ये रिप्लाय, फॉरवर्ड, स्टार मेसेज, डिलीट हे ऑप्शन येतील. त्यामधील फॉरवर्ड ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्ही हव्या त्या व्यक्तीला तो मेसेज किंवा फाईल पाठवू शकता. ही सुविधा सध्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.
तुम्ही जर ग्रुपमध्ये चॅट करत असाल तर एखाद्या ठराविक व्यक्तीच्या मेसेजलाही रिप्लाय करु शकता. मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे एखादा मेसेज सिलेक्ट करुन रिप्लाय करता येते तिच सुविधा वेब व्हॉट्स अॅप वरही आहे.
लवकरच व्हॉट्सअॅप आता व्हिडीओ कॉल सुरू करण्याचा विचार करत आहे. फेसबूक मेसेंजरप्रमाणे व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा सुरू करण्याचा विचार व्हाट्सअॅप करत आहे. मात्र ही सुविधा कधीपर्यत सुरू होईल हे अद्याप नक्की झालेले नाही. पुढील दोन ते तीन महिन्यात व्हिडीओ कॉलिंग सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोबतच फोटोमध्ये ड्रॉईंग टूल्स आणि ब्लर करण्याची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.