अरे व्वा ! आता डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरुनही फेसबूक लाईव्ह

By admin | Published: March 23, 2017 04:44 PM2017-03-23T16:44:25+5:302017-03-23T17:00:32+5:30

फेसबूक यूजर्ससाठी खूशखबर असून आता डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरुनही लाईव्ह करणं शक्य होणार आहे

Oh wow! Now Facebook Live from Desktop and Laptop | अरे व्वा ! आता डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरुनही फेसबूक लाईव्ह

अरे व्वा ! आता डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरुनही फेसबूक लाईव्ह

Next
>ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 23 - फेसबूक यूजर्ससाठी एक खूशखबर आहे. आता डेस्कटॉप आणि लॅपटॉपवरुनही लाईव्ह करणं शक्य होणार आहे. यासाठी तुमच्या कॉम्प्यूटरमध्ये वेबकॅम असणं गरजेचं असणार आहे. आतापर्यंत फेसबूकवरुन लाईव्ह करण्याची सुविधा फक्त मोबाईलमध्येच उपलब्ध होती. त्यामुळे अनेकांनी हा ऑप्शन डेस्कटॉप आणि लॅपटॉपमध्येही असावा अशी मागणी केली होती. त्यानंतर अखेर फेसबूकने हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. 
 
(फेसबुकवर Like सोबतच आता Dislike चा पर्याय ?)
(सावधान, जास्त वेळ फेसबुकमध्ये गुंतू नका!)
 
डेस्कटॉपवरुन लाईव्ह करण्याची सुविधा सुरुवातीला फक्त पेजेसमध्ये उपलब्ध होती, पण आता कोणत्याही डेस्कटॉपवरुन लाईव्ह केलं जाऊ शकतं अशी माहिती बुधवारी फेसबूकने आपल्या ब्लॉगवरुन दिली आहे. यासाठी स्टेटस अपडेट कंपोजरमधील लाईव्ह ऑप्शनवर क्लिक करावं लागणार आहे. 
 
फेसबूकने याशिवाय अजून एक फिचर आणलं आहे. यामध्ये स्ट्रिमिंग सॉफ्टवेअर किंवा इतर एक्सटर्नल सॉफ्टवेअरच्या मदतीने लाईव्ह करण्याची सुविधा उपलब्ध असेल. 
 
फेसबूकने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, या अपडेटमुळे युजर्स आपल्या फेसबूक व्हिडीओ लाईव्हमध्ये स्क्रीन्स शेअर करु शकतात, तसंच ग्राफिक्सही अॅड केले जाऊ शकतात. शिवाय कॅमेरा स्विचही केला जाऊ शकतो. किंवा प्रोफेशनल उपकरणाचाही वापर करु शकतात. 
 
या नव्या अपडेटमुळे युजर्स कॉम्प्यूटरवर खेळले जाणारे गेम्सदेखील आपले मित्र आणि फॉलोअर्ससोबत लाईव्हच्या माध्यमातून शेअर करु शकतात.
 

Web Title: Oh wow! Now Facebook Live from Desktop and Laptop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.