वृद्धाची शहापुरात निघृण हत्या
By Admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:16+5:302015-09-01T21:38:16+5:30
किन्हवली : जमीन दलालांनी आपसात संगनमत करून मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने आंबेखोरपठार (शहापूर) येथे भिवंडीतील वेहळे गावातील वृद्धाला बोलावून त्यास दगडाने ठेचून त्याचे प्रेत खोल दरीत फेकून दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. रमेश राजाराम पाटील (६०) असे त्यांचे नाव आहे. कौटुंबिक वाद झाल्याने ते मागील अनेक दिवसांपासून एकटेच राहत होते. एकटे राहत असल्याने सर्व घरगुती कामे जशी घरात जेवण,कपडे धुणे,भांडी घासणे अशी कामे त्यांना करावी लागत होती. त्यामुळे नातेवाईक व मित्र मंडळीकडून त्यांना लग्नाचा सल्ला देण्यात आला होता. त्याबाबत त्यांनी गावातील जमीन दलाल रितलाल दशरथ पाटील याच्याकडे दोन महिन्यांपूर्वी लग्नाचा विचार बोलून दाखवला. त्यावेळी त्यांनी आंबेखोर पठार येथील जमीन दलाल मित्र नवनाथ उर्फपांडुरंग गगे व संतोष वामन गगे यांच्याशी संपर्क करून मुलगी दाखवण्याचे आश्वासन दिले. या ब
क न्हवली : जमीन दलालांनी आपसात संगनमत करून मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने आंबेखोरपठार (शहापूर) येथे भिवंडीतील वेहळे गावातील वृद्धाला बोलावून त्यास दगडाने ठेचून त्याचे प्रेत खोल दरीत फेकून दिल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. रमेश राजाराम पाटील (६०) असे त्यांचे नाव आहे. कौटुंबिक वाद झाल्याने ते मागील अनेक दिवसांपासून एकटेच राहत होते. एकटे राहत असल्याने सर्व घरगुती कामे जशी घरात जेवण,कपडे धुणे,भांडी घासणे अशी कामे त्यांना करावी लागत होती. त्यामुळे नातेवाईक व मित्र मंडळीकडून त्यांना लग्नाचा सल्ला देण्यात आला होता. त्याबाबत त्यांनी गावातील जमीन दलाल रितलाल दशरथ पाटील याच्याकडे दोन महिन्यांपूर्वी लग्नाचा विचार बोलून दाखवला. त्यावेळी त्यांनी आंबेखोर पठार येथील जमीन दलाल मित्र नवनाथ उर्फपांडुरंग गगे व संतोष वामन गगे यांच्याशी संपर्क करून मुलगी दाखवण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने तिघांनी संगनमताने रमेशकडून पैसेदेखील उकळले होते. त्यातच रमेश व रितलाल यांच्यात आर्थिक देवाणघेवाण होती. याच कारणावरून रितलाल, नवनाथ, संतोष यांनी २४ ऑगस्ट रोजी रमेश यास मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने आंबेखोर येथे बोलावून दगडाने त्याचे डोके ठेचून मृतदेह २०० फुट खोल दरीत फेकून दिला. या प्रकरणी प्रथम नारपोली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्र ार दाखल झाली होती. पोलीस तपासात रमेश याच्या खुनाचा संशय बळावल्याने रितलाल, नवनाथ ,संतोष या तिघांना तपासाकरीता ताब्यात घेतले असता त्यांनी खुनाची कबुली दिली. मात्र खुनाची घटना आंबेखोर पठार (किन्हवली - शहापूर ) येथे घडल्याने पुढील तपासासाठी तिन्ही मारेकर्यांना किन्हवली पोलिसांच्या हवाली केले. या तिघांना रविवारी शहापूर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुणावली आहे.