जुन्या भिडूंनी पुन्हा केली हातमिळवणी, त्रिपुरातील युतीवर मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:12 AM2023-02-12T06:12:27+5:302023-02-12T06:13:20+5:30

त्रिपुरात काँग्रेस-माकपा युतीवर मोदींची टीका

Old Bhidus join hands again, Modi criticizes alliance in Tripura | जुन्या भिडूंनी पुन्हा केली हातमिळवणी, त्रिपुरातील युतीवर मोदींची टीका

जुन्या भिडूंनी पुन्हा केली हातमिळवणी, त्रिपुरातील युतीवर मोदींची टीका

googlenewsNext

आमबासा (त्रिपुरा) : कुशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुन्या भिडूंनी हातमिळवणी केली आहे, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्रिपुरातील काँग्रेस-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकपा) युतीवर सोडले. धलाई जिल्ह्यातील आमबासा येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते.

टिपरा मोथा या प्रादेशिक पक्षाचे नाव न घेता मोदी म्हणाले की, इतर अनेक पक्षही विरोधी आघाडीला  अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत ; परंतु, त्यांना दिलेले प्रत्येक मत त्रिपुराला अनेक वर्षे मागे लोटेल.  काँग्रेस आणि डाव्यांना लोकांच्या फायद्याच्या सर्व योजना ठप्प करायच्या आहेत, अशी टीका माेदींनी केली. 

चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील 
बंगळुरू : आपले सरकार चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी नेहमीच कठोर परिश्रम करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. 
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरू- म्हैसूर एक्स्प्रेस कॉरिडॉरवर केलेले ट्वीट रिट्वीट करून मोदी म्हणाले की, केंद्र सरकार चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी कठोर परिश्रम करत असून आपले सरकार नेहमीच हे करेल. 
बंगळुरू व म्हैसूर दरम्यानच्या १० पदरी महामार्गाच्या उड्डाणपुलाखालून वंदे भारत एक्स्प्रेस जात असल्याचा व्हिडीओ ड्रोनने टिपला आहे. 

Web Title: Old Bhidus join hands again, Modi criticizes alliance in Tripura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.