बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार

By admin | Published: July 30, 2016 02:03 AM2016-07-30T02:03:49+5:302016-07-30T02:03:49+5:30

विविध राज्यात सध्या पावसाने कहर केला असून, मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर गुडगावात तब्बल १५ ते २० किमी पर्यंत वाहनांच्या रांगा

Old hawker in bangalore | बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार

बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार

Next

गुडगाव/बंगळुरू : विविध राज्यात सध्या पावसाने कहर केला असून, मुसळधार पावसाचे पाणी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर गुडगावात तब्बल १५ ते २० किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. दुसरीकडे बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार माजला असून, शहरात चार दिवसांत शहरात १९५ मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणीच पाणी झाले आहे. तर बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा थेट वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बंगळुरुत अनेक भागात पाण्यामुळे नागरिक अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोटींची मदत घेण्यात येत आहे.
शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कार्यालयीन कर्मचारी वाहनांच्या या कोंडीत फसले गेले. अनेक शाळा आणि कार्यालयांनीही त्यामुळे शुक्रवारी सुटीच जाहीर केली.
वाहनांची ही कोंडी एवढी वाढत गेली की, अनेक दुचाकीस्वारांनी आपले वाहन तेथेच सोडून देत दिल्ली - जयपूर रोडच्या दोन्ही बाजंूनी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढला. गुरुवारी या भागात मुसळधार पाउस झाला. त्यामुळे मुख्य नालीचे पाणी थेट रस्त्यांवर आले. रात्रीपासूनच तुंबलेल्या पाण्याची ही समस्या सुरु झाली. दिल्ली- जयपूर रस्त्याला जोडणाऱ्या मुख्य मार्ग एनएच-८ वर शेकडो ट्रक फसलेले आहेत. सकाळी या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्यानंतर ही कोंडी प्रचंड वाढली. (वृत्तसंस्था)

गुडगावमध्ये कलम १४४
राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर वाहतूक जाम झाल्यानंतर हजारो प्रवासी अडकले आहेत. दरम्यान, ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी गुडगावचे उपायुक्त टी. एम. सत्यप्रकाश यांनी हीरो होंडा चौकात कलम १४४ लागू केले आहे.

नायडू - खट्टर यांच्यात चर्चा
गुडगावमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरी विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास आवश्यक ते पाउले उचलण्याचे त्यांनी सूचित केले. नायडू म्हणाले की, नाल्यांचे काम न केल्यामुळे उद्भवली आहे.

गुडगावमधील ट्रॅफिक जामचे खापर भाजपा दुसऱ्यांवर फोडत आहे. प्रवासी आणि विशेषत: अ‍ॅम्बुलन्स यांच्यासाठी तर ही अग्निपरीक्षा आहे. कारण, अनेक तासांपासून लोक येथे अडकले आहेत.
- राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँगे्रस

मनोहरलाल खट्टर सरकार गुडगावमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. केंद्र व राज्यातही त्यांचेच सरकार आहे. गत २४ महिन्यात आपण काय केले? वीज, पाणी आणि रस्ते या सुविधा नसतानाही भाजपाने इमारतींच्या विस्तारास परवानगी दिली.
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस

Web Title: Old hawker in bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.