'ओल्ड माँक' या प्रसिद्ध रमच्या निर्मात्याचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 04:35 PM2018-01-09T16:35:30+5:302018-01-09T16:52:53+5:30
'ओल्ड माँक' या प्रसिद्ध रमचे निर्माते कपिल मोहन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी गाझियाबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गाझियाबाद येथील मोहन नगर येथे ते वास्तव्यास होते. गेल्या काही वर्षांपासून मोहन आजारी होते.
नवी दिल्ली: 'ओल्ड माँक' या प्रसिद्ध रमचे निर्माते कपिल मोहन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी गाझियाबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गाझियाबाद येथील मोहन नगर येथे ते वास्तव्यास होते. गेल्या काही वर्षांपासून मोहन आजारी होते. जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून 'ओल्ड माँक'ची ख्याती होती.
कपिल मोहन हे 1965 च्या आधीपासून ट्रेड लिंक्स प्रा. लि. चे प्रमुख होते. त्यांनी डायर मीकिन ब्रेव्हरेजची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला होता. या कंपनीतच ओल्ड माँकसह इतर पेय तयार केले जातात. विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या मोहन यांच्यामुळे मीकिन लि.ची सध्याची उलाढाल ही 400 कोटी रूपयांहून अधिक आहे.
त्यांनी धुरा सांभाळल्यानंतर ओल्ड माँक रम भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय झाली झाली होती. 1954 मध्ये ओल्ड माँकचे उत्पादन सुरू झाले होते. मोहन हे लष्करातून निवृत्त झाले होते. त्यांना 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.