जुन्या नोटांची मोजणी अजूनही सुरूच - आरबीआय

By admin | Published: January 5, 2017 10:58 PM2017-01-05T22:58:45+5:302017-01-05T22:58:45+5:30

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आत्तापर्यंत देशभरातील बँकांमध्ये जवळपास 97 टक्के जुन्या नोटा आल्या

Old notes still counting - RBI | जुन्या नोटांची मोजणी अजूनही सुरूच - आरबीआय

जुन्या नोटांची मोजणी अजूनही सुरूच - आरबीआय

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 05 -  पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आत्तापर्यंत  देशभरातील बँकांमध्ये जवळपास 97 टक्के जुन्या नोटा आल्या असून अद्याप मोजणी सुरु असल्याची माहिती गुरूवारी रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. 
 देशभरातील बँकांमध्ये परत आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा नोटांची मोजणी अद्यापही सुरुच आहे. आत्तापर्यंत जवळपास  97 टक्के जुन्या नोटा आल्या आहेत. तसेच, नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर नोटांबद्दल माहिती देण्यात येईल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. दरम्यान, १० डिसेंबरला रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी रद्द झालेल्या नोटांपैकी १२ लाख ४४ हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्याचे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले होते. 
दरम्यान, नोटा बदलून देण्याच्या शेवटच्या दिवशी रिझर्व्ह बँकेने देशभरातील सर्व बँकांना त्यांच्याकडे जमा झालेल्या नोटांची माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. 
 

Web Title: Old notes still counting - RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.