पंजाबमध्येही जुनी पेन्शन योजना; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 06:53 AM2022-10-28T06:53:38+5:302022-10-28T06:54:09+5:30
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धार्मिक ग्रंथांची ने-आण करणाऱ्या वाहनांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे.
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबमधील मान सरकारने कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची मोठी भेट दिली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धार्मिक ग्रंथांची ने-आण करणाऱ्या वाहनांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे. मोहालीत नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
तरुणांना रोजगार देण्यासाठीच्या नियमात बदल करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. मान म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी आपने लोकांना जी आश्वासने दिली होती, ती सर्व पूर्ण करण्यात येतील.
...तर हिमाचल आणि गुजरातमध्येही पेन्शन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मान सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. केजरीवाल म्हणाले की, नवी पेन्शन योजना हा कर्मचाऱ्यांवर अन्याय होता. हिमाचल आणि गुजरातमधील लोकांनी आपला सत्तेत येण्याची संधी दिली तर या दोन्ही राज्यांत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल.