आजीबार्इंना पैकीच्या पैकी गुण! ९६व्या वर्षीही शिक्षणाची भूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 05:33 AM2018-08-13T05:33:40+5:302018-08-13T05:34:06+5:30

केरळमधील एका आजीबार्इंनी वयाच्या ९६ व्या वर्षी आयुष्यातील पहिलीच परीक्षा दिली आणि त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवून शिक्षणाची जिद्द असली की वय हा मुद्दा गौण ठरतो हे सिद्ध केले.

old women News | आजीबार्इंना पैकीच्या पैकी गुण! ९६व्या वर्षीही शिक्षणाची भूक

आजीबार्इंना पैकीच्या पैकी गुण! ९६व्या वर्षीही शिक्षणाची भूक

googlenewsNext

थिरुवनंतपूरम : केरळमधील एका आजीबार्इंनी वयाच्या ९६ व्या वर्षी आयुष्यातील पहिलीच परीक्षा दिली आणि त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवून शिक्षणाची जिद्द असली की वय हा मुद्दा गौण ठरतो हे सिद्ध केले. समाजमाध्यमांमध्ये या आजीबार्इं कौतुक आणि प्रशंसेचा विषय झाल्या आहेत.
या वृद्धचे नाव कार्तयिनी अम्मा असे असून ती अलापुझ्झा जिल्ह्याची रहिवासी आहे. केरळ सरकारतर्फे निरक्षरांना साक्षर करण्यासाठी ‘अक्षरलक्ष्यम’ नावाची योजना राबविली जाते. त्यात कार्तयिनी अम्मा यांनी गेल्या रविवारी इयत्ता चौथीच्या समकक्ष परीक्षा दिली व त्यात पैकीच्या पैकी गुण पटकाविले.
या आजीबार्इंनी गेल्या जानेवारीत या मोहिमेत शिकण्यासाठी नाव नोंदविले. पहिल्या टप्प्यात फक्त वाचनाची परीक्षा घेण्यात आली. त्यात त्यांनी उज्जवल यश संपादित केले. आता लिखाणाची परीक्षा घेतली जाईल. त्यातही उत्तीर्ण झाल्या की पुढील शैक्षणिक वर्षापासून आजीबाई थेट इयत्ता चौथीच्या वर्गात जाऊन बसतील. सती नावाच्या समन्वय शिक्षिकेने कार्तयिनी अम्मांकडून अभ्यास करून घेतला.
टिष्ट्वटरवर २५० हून अधिक लोकांनी कार्तयिनी अम्मा यांच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला दाद दिली. आजीबार्इंना शाबासकी देणाऱ्यांमध्ये उद्योगपती आनंद महिंद्र हेही होते. त्यांनी लिहिले, जे काही वाचले ते खरे असेल तर या आजीबार्इंना तोड नाही. (वृत्तसंस्था)
 

Web Title: old women News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.