पतंजलीच्या "त्या" उत्पादनांवरील ओम चिन्हाची बंदी फेटाळली

By admin | Published: May 5, 2017 05:48 PM2017-05-05T17:48:00+5:302017-05-05T17:48:00+5:30

योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या स्वच्छतेच्या उत्पादनांवर असलेल्या ओम चिन्हावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका अलहाबाद हायकोर्टाने फेटाळली आहे.

Om Namah ban on Patanjali's "those" products rejected | पतंजलीच्या "त्या" उत्पादनांवरील ओम चिन्हाची बंदी फेटाळली

पतंजलीच्या "त्या" उत्पादनांवरील ओम चिन्हाची बंदी फेटाळली

Next
>ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. 05 - योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या स्वच्छतेच्या उत्पादनांवर असलेल्या ओम चिन्हावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका अलहाबाद हायकोर्टाने फेटाळली आहे.
रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणा-या उत्पादनांवर ओम चिन्ह असून त्यावर बंदी घालण्याची जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते आर. एस. कुशवाह यांनी दाखल केली होती. या जनहित याचिकेवरील सुनावणी न्यायाधीश व्ही.के. शुक्ला आणि एम.सी.त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी झाली. यावेळी या उत्पादनांवर असलेले ओम चिन्ह कोणत्या कायद्याचे उल्लंघन करत आहे, असे म्हणत अलहाबाद हायकोर्टाने ही जनहित याचिका फेटाळून लावली. 
पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनी लोगोमध्ये ओम चिन्हाजवळ रामदेव बाबा यांचा फोटो लावला आहे. ओम हिंदू धर्मियांचा मंत्र आहे. त्याचबरोबर जैन, शीख आणि बौद्ध धर्मियांमध्ये ओमला मानले जाते. प्रसाधनगृह उत्पादनांवर ओम चिन्ह

Web Title: Om Namah ban on Patanjali's "those" products rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.