उमर अब्दुल्लांच्या पत्नीने केली 15 लाखांच्या पोटगीची मागणी
By Admin | Published: September 12, 2016 02:49 PM2016-09-12T14:49:58+5:302016-09-12T15:17:35+5:30
पायल अब्दुल्लाने फॅमिली कोर्टात उमर यांच्यावर दर महिन्याला 15 लाख रूपये पोटगी देण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे.
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर,दि.12- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या पत्नीने पोटगी म्हणून दर महिन्याला 15 लाख रूपयांची मागणी केली आहे. पायल अब्दुल्लाने फॅमिली कोर्टात उमर यांच्यावर 15 लाख रूपये पोटगी देण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे. सरकारी बंगल्यातून काढल्यामुळे मी आता बेघर आणि कंगाल झाले आहे. महिन्याभरापूर्वीच दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना सरकारी बंगल्यातून बेदखल करण्यात आलं होतं.
इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,पायलने स्वतःच्या व दोन्ही मुलांच्या सांभाळासाठी दर महिन्याला 10 लाख रूपये याशिवाय नवीन घरासाठी 5 लाख रूपयांची मागणी केली आहे. दोन्ही मुलांना झेड आणि झेड+ सुरक्षा मिळाली आहे त्यामुळे सरकारी घरातून बेदखल केल्याने माझ्यासमोर मोठी समस्या असल्याचं पायल म्हणाल्या.
पायलच्या याचिकेवर फॅमिली कोर्टाने उमर अब्दुल्लांना 27 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला आहे.