लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 02:58 PM2022-02-11T14:58:06+5:302022-02-11T15:05:14+5:30

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे.

Omar Khalid's question on the bail of the minister's son, netizens troll to swara bhaskar | लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग...

लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग...

Next
ठळक मुद्देजेव्हा एखादा निर्णय तुमच्या बाजुने येतो, तेव्हाच तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवता, संविधान आणि त्यावर चालणाऱ्या संस्थांवर सोयीनुसार विश्वास, असे एका युजर्संने म्हटले आहे.

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. 

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे. तर, अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करुन, 'सिद्दीक कप्पन… उमर खालिद… कहीं और हैं’।'... असे ट्विट स्वराने केलंय. म्हणजेच उमर खालिद अन् सिद्दीक कप्पनला अद्याप जामीन मिळाला नसल्याकडे स्वराने लक्ष वेधले. स्वराच्या या ट्विटनंतर नेटीझन्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणाऱ्या न्यायव्यवस्थेवर तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात का? असा सवाल एका ट्विटर युजर्संने विचारला आहे. 

जेव्हा एखादा निर्णय तुमच्या बाजुने येतो, तेव्हाच तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवता, संविधान आणि त्यावर चालणाऱ्या संस्थांवर सोयीनुसार विश्वास, असे एका युजर्संने म्हटले आहे. तर, रिंकू नावाच्या एका ट्विटर युजर्सने, मुलगा शाहरुख खानचा असेल तर जामीन मिळणे हा त्याचा अधिकार आहे. आणि मुलगा भाजपचा नेता असेल तर जामीन कसा मिळाला? असा खोचक टोला लगावला आहे. 

चित्रपट निर्माता आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कापडी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कुचलणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला जामीन मिळाला, पण हाथरस गँगरेप कव्हर करणारे पत्रकार सिद्दिकी कप्पन 1 वर्षांपासून तुरुंगातच आहे. तर, जयराज सिंह यांनी ट्विट करुन जामीनावर प्रश्न उपस्थित केला आहे. आशिष मिश्राला जामीन मिळाला, उमर खालीदला नाही, असे सिंह यांनी ट्विट केले आहे. 

लखीमपूर खेरी हिंसाचार काय

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा याला जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टेनीचा मुलगा आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
 

Web Title: Omar Khalid's question on the bail of the minister's son, netizens troll to swara bhaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.