बापरे! कोरोना पाठ सोडेना; निगेटिव्ह रुग्ण महिनाभरात दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 03:12 PM2020-08-09T15:12:40+5:302020-08-09T15:12:58+5:30
CoronaVirus कानपूरच्या लाला लजपत राय कोविड हॉस्पिटलमध्ये हा प्रकार समोर आला आहे. येथे या रुग्णाचा 17 जुलैला कोरोना व्हायरसचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्याला घरी सोडण्यात आले होते. त्याची तब्येतही घरी चांगली होती.
कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. एका 45 वर्षांच्या रुग्णाने कोरोनावर मात केलेली असताना महिनाभरात पुन्हा तो कोरोनाबाधित झाला आहे. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले होते. मात्र, पुन्हा कोरोनाने त्याला गाठल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
कानपूरच्या लाला लजपत राय कोविड हॉस्पिटलमध्ये हा प्रकार समोर आला आहे. येथे या रुग्णाचा 17 जुलैला कोरोना व्हायरसचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्याला घरी सोडण्यात आले होते. त्याची तब्येतही घरी चांगली होती.
यानंतर तीन ऑगस्टला रुग्णाची तब्येत खालावली. त्यामुळ त्याला पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले. कोरोनाची लक्षणे दिसताच त्याची पुन्हा चाचणी करण्यात आली. तेव्हा ती पॉझिटिव्ह आली. उत्तर प्रदेशीतील हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यामध्ये एकदा बरा झालेला रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित सापडला आहे.
धक्कादायक म्हणजे या व्यक्तीचा रस्ते अपघात झाला होता. तेव्हा त्याच्या पायाचे हाड मोडले होते. त्याला ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये भरती करण्यात आले होते. 3 जुलैला त्याचे ऑपरेशन होणार होते. मात्र, त्याआधी डॉक्टरांनी त्याची कोरोना टेस्ट केली. 5 जुलैला रिपोर्ट आल्यावर तो कोरोना बाधित असल्याचे समजले. उपचारानंतर तो बरा झाला होता. यामुळे त्याला 17 जुलैला सोडण्यात आले होते.
दोनवेळा ऑपरेशन टाळले
3 ऑगस्टला त्याला हॉस्पिटलला आणण्यात आले होते. त्याच्यावर ऑपरेशन करण्यात येणार होते. मात्र, पुन्हा त्याची कोरोना टेस्ट केल्याने व बाधित असल्याचे समोर आल्याने ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. संजय कुमार यांनी हे ऑपरेशन दुसऱ्यांदा पुढे ढकलले आहे. त्यांनी मायक्रोबायोलॉजी विभागाला पत्र लिहिले असून यावर मार्गदर्शन मागितले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती
Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य
चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'
रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट
Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग
BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत
उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक एन्काऊंटर; भाजपा आमदार हत्याकांडातील गँगस्टरचा खात्मा
आजचे राशीभविष्य - 9 ऑगस्ट 2020; वृषभ राशीच्या लग्नाळुंसाठी विवाहाचे योग