झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:15 PM2020-07-01T12:15:37+5:302020-07-01T12:25:21+5:30

CoronaVirus कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून 127 किमी लांब असलेल्या तुमकुर जिल्ह्यातील गोडकेरे गावामध्ये हा गुराखी राहतो. त्याला कोरोना झाल्याचे निदान झाल्याने तो राखत असलेल्या 47 बकऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. भारतातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. 

OMG! cowherd was CoronaVirus positive; Quarantined 47 goats in Karnataka | झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

Next

बंगळुरू : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना कोरोना रुग्णांची संख्या इतरांच्या तुलनेत कमी असल्याने कर्नाटक राज्य तसे अलिप्त राहिले होते. मात्र, आज पुन्हा चर्चेत आले आहे. तिथे एका बकरी चारणाऱ्या गुराख्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 


कर्नाटकची राजधानी बेंगळुरूपासून 127 किमी लांब असलेल्या तुमकुर जिल्ह्यातील गोडकेरे गावामध्ये हा गुराखी राहतो. त्याला कोरोना झाल्याचे निदान झाल्याने तो राखत असलेल्या 47 बकऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. भारतातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. 


जिल्ह्याच्या पशुपालन अधिकाऱ्यांनी सांगितले की, गौरलहट्टी तालुक्यामध्ये जवळपास 300 घरे आहेत. येथील लोकसंख्याही खूप कमी म्हणजे 1000 एवढी आहे. या ठिकाणी गुराख्यासह दोघे गावकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय चार बकऱ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावकरी दहशतीमध्ये आले आहेत. गावकऱ्यांनी सांगितले की, काही बकऱ्यांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. 


यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावामध्ये तातडीने पाठवून दिले आणि बकऱ्यांना गावाबाहेर क्वारंटाईन करण्यात आले. या बकऱ्यांचेही स्वॅब नमुने घेण्यात आले असून हे नमुने भोपाळच्या पशु स्वास्थ्य आणि पशु उपचार संस्थेला पाठविण्यात आले आहेत. 


मृत बकऱ्यांचे पोस्टमार्टेम
पशुपालन विभागाचे सचिव पी मनीवन्नन यांनी सांगितले की, या घटनेबाबत समजले आहे. मृत बकऱ्यांचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे. या बकऱ्यांचे नमुने बंगळुरुच्या इंस्टिट्यूट ऑफ अॅनिमल हेल्थ अँड वेटेनरी बायलॉजिकल्स (IAHVB) ला पाठविण्यात आले आहेत. 


....तर हे पहिलेच प्रकरण असेल
IAHVB चे संचालक डॉ. एसएम बायरेगौड़ा यांनी सांगितलेकी, माणसाकडून जनावरांना कोरोना झाल्याचे  आतापर्यंत कुठेही आढळलेले नाहीय. आमच्याकडे तपासणी किट नसल्याने हे नमुने भोपाळला पाठविण्यात आले आहेत. तर UAS च्या GKVK चे प्राध्यापक डॉ. बीएल चिदानंद यांनी सांगितले की, कोरोना व्हायरससारखे जूनोटिक व्हायरस हे सामान्यपणे जनावरांतून माणसामध्ये पसरतात. माणसांपासून जनावरांना त्यांची लागण होत नाही. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

Video: माणुसकी हरली! कोरोनाबाधित वृद्धाचा मृतदेह जेसीबीने उचलला

बाबो! लग्नाच्या ९ वर्षांनंतर समजले पत्नी 'पुरूष' आहे; पतीला बसला मानसिक धक्का

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

Web Title: OMG! cowherd was CoronaVirus positive; Quarantined 47 goats in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.