ओमायक्रॉनच्या 9 व्हेरिएंट्सचा दिल्लीत कहर, जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:10 PM2022-04-21T15:10:32+5:302022-04-21T15:11:13+5:30
Omicron : सरकारी सूत्रांनी सांगितले की, दिल्लीत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांमागे ओमाक्रॉनचे 9 सब व्हेरिएंट्स आहेत.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, दिल्लीत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांमागे ओमायक्रॉनचे सर्व व्हेरिएंट हे मुख्य कारण असल्याची बातमी समोर आली आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, दिल्लीत झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांमागे ओमाक्रॉनचे 9 सब व्हेरिएंट्स आहेत. ओमायक्रॉनच्या BA.2.12.1 सह 9 व्हेरिएंट्सची दिल्लीतील जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये पुष्टी झाली आहे.
दिल्लीत कोरोनाचा वेग कायम आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 1,009 रुग्ण आढळले आहेत. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिल्लीत कोरोनाच्या 601 रुग्णांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिल्लीत संसर्ग दर 5.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर 314 लोक बरे होऊन घरी परत आले आहेत. आता चिंतेची बाब म्हणजे 10 फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा दिल्लीत कोरोनाची प्रकरणे हजाराच्या वर गेली आहेत.
10 फेब्रुवारी रोजी दिल्लीत कोरोनाचे 1104 रुग्ण आढळले. आता प्रकरणे वाढत आहेत, परंतु दिल्लीत अद्याप कोरोना टेस्टिंग फारशी वाढलेली नाही. बुधवारी राजधानीत एकूण 17701 कोरोना टेस्ट करण्यात आल्या, येथेही आरटीपीसीआरची संख्या केवळ 9581 होती. अशा परिस्थितीत आगामी काळात कोरोना टेस्टिंग वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.
स्थानिक आरोग्य अधिकार्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 10 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान दिल्लीतील सकारात्मकतेचा दर एका आठवड्यात 6 पट वाढला आहे. 10 एप्रिल रोजी दिल्लीत सकारात्मकता दर 1.29% होता. त्यानंतर एका दिवसात 141 प्रकरणे समोर आली. सोमवारी ते 7.72% पर्यंत वाढले.