Omicron Variant : सावधान! देशात अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; 19 राज्यांमध्ये 578 रुग्ण, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 11:00 AM2021-12-27T11:00:28+5:302021-12-27T11:09:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉनचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

omicron in india spreading fast 578 positive cases in 19 states now delhi on top with 142 | Omicron Variant : सावधान! देशात अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; 19 राज्यांमध्ये 578 रुग्ण, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

Omicron Variant : सावधान! देशात अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; 19 राज्यांमध्ये 578 रुग्ण, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,531 नवे रुग्ण आढळून आले आहेत. य़ाच दरम्यान ओमायक्रॉनचा देखील अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. देशात वेगाने ओमायक्रॉन पसरत आहे. 19 राज्यांमध्ये आता तब्बल 578 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण संख्या ही दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना आता ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. 

देशात सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे आता दिल्लीमध्ये सापडले आहेत. दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या 142 वर पोहोचली असून 23 जण बरे झाले आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे. आतापर्यंत 141 रुग्ण असून 42 ठीक झाले आहेत. केरळमध्ये ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या 57 आहे, त्यापैकी फक्त 1 रुग्ण बरा झाला आहे. तेलंगणामध्ये एकूण 41 रुग्ण आढळले असून त्यापैकी 10 रुग्ण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत 49 बाधित आढळले असून त्यापैकी 10 बरे झाले आहेत. तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनचे 34 रुग्ण आहेत. कर्नाटकात आतापर्यंत 31 रुग्ण आढळले असून 15 रुग्ण बरे झाले आहेत.

जाणून घ्या, कोणत्या राज्यात किती रुग्ण? 

राजस्थानमध्ये आतापर्यंत 43 रुग्ण आढळले असून त्यापैकी 30 बरे झाले आहेत. हरियाणामध्ये 4 संक्रमित आढळले. त्यापैकी दोन जण बरे झाले आहेत. मध्य प्रदेशमध्ये 9 रुग्ण आढळले, त्यापैकी 7 जण बरे झाले. ओडिशात आतापर्यंत 4 रुग्ण आढळले आहेत पण एकही जण बरा झालेला नाही. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 6 रुग्ण आढळले असून त्यापैकी एक बरा झाला आहे. आंध्र प्रदेशात आतापर्यंत 6 रुग्ण आढळले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 3 रुग्ण सापडले होते. पण ते तिघेही बरे झाले आहेत. चंदीगडमध्ये आतापर्यंत 3 रुग्ण आढळले आहेत, 2 बरे झाले आहेत. लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला होता. पण आता तो बरा असल्याची माहिती मिळत आहे. 

कोट्यवधी लोकांनी घेतली कोरोनाची लस

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरातील सरकारांनी आता कोरोना या महाभयंकर संकटाचा अंत करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसिस यांनी 2022 या वर्षात आपण कोरोना नावाच्या या साथीच्या रोगाचा अंत केला पाहिजे. येत्या वर्षात अंत करायचा असल्यास, वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकसंख्येचं लसीकरण केले जाईल, याची खात्री करून ही असमानता संपवायला हवी असं म्हटलं आहे.
 

Web Title: omicron in india spreading fast 578 positive cases in 19 states now delhi on top with 142

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.