CoronaVirus, Omicron Live Updates: चिंताजनक! देशात ओमायक्रॉनच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात; केंद्राच्या इन्साकॉगची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 01:24 PM2022-01-23T13:24:39+5:302022-01-23T13:25:52+5:30

Omicron community transmission Started: ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला दुसरा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. याचबरोबर युरोपमध्ये या नव्या व्हेरिअंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे म्हटले आहे.

Omicron is now in community transmission stage in India and has become dominant in multiple metros: INSACOG | CoronaVirus, Omicron Live Updates: चिंताजनक! देशात ओमायक्रॉनच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात; केंद्राच्या इन्साकॉगची घोषणा

CoronaVirus, Omicron Live Updates: चिंताजनक! देशात ओमायक्रॉनच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात; केंद्राच्या इन्साकॉगची घोषणा

googlenewsNext

गेल्या महिना भरापासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आता दिवसाला सव्वातीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. महाराष्ट्र,केरळ, कर्नाटकमध्ये दिवसाला प्रत्येकी ४० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिअंटचेही देशात रुग्ण सापडू लागले असताना केंद्राची कोरोनावर लक्ष ठेवणारी समिती इन्साकॉगने ओमायक्रॉनने सामुहिक प्रसाराला सुरुवात केल्याची घोषणा केली आहे. 

ओमायक्रॉनपासून निर्माण झालेला दुसरा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतात सापडल्याचा दावा ब्रिटनने केला आहे. याचबरोबर युरोपमध्ये या नव्या व्हेरिअंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर इन्साकॉ़गचा इशारा आला आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

NSACOG ची स्थापना 25 डिसेंबर 2020 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत करण्यात आली. ही समिती भारतातील कोविड-19 आणि विषाणूच्या प्रकारांच्या जीनोम अनुक्रमांचा अभ्यास आणि निरीक्षण करते.



 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 3,33,533 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,89,409 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 93.18 टक्क्यांवर आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १०००० पेक्षा जास्त झाली आहे. 
 

Web Title: Omicron is now in community transmission stage in India and has become dominant in multiple metros: INSACOG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.