Omicron Variant : देशात ४२२ जणांना ओमायक्रॉनची बाधा, संसर्ग १७ राज्यांत पसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 06:51 AM2021-12-27T06:51:26+5:302021-12-27T06:51:42+5:30
Omicron Variant : महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. महाराष्ट्रात रविवारी ३१ ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले.
नवी दिल्ली/मुंबई : देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर गेली असून १३० जण बरे झाले. या विषाणूचा संसर्ग १७ राज्यांत पसरला आहे. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. महाराष्ट्रात रविवारी ३१ ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले.
चोवीस तासांत देशात कोरोनाचे ६९८७ नवे रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३,४७,८६,८०२ झाला आहे.
अहमदनगरमध्ये ५३ विद्यार्थ्यांना बाधा
अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोनाबाधितांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. राज्यात रविवारी १,६४८ नव्या कोरोना बाधितांची
नोंद झाली. तर मुंबईत ९२२ बाधित आढळले.
काेराेनाची रुग्णसंख्या वाढता वाढता वाढे!
दिनांक मुंबई ठाणे
२१ डिसेंबर ३२७ ६६
२२ डिसेंबर ४९० १४६
२३ डिसेंबर ६०२ १५३
२४ डिसेंबर ६८३ १७८
२५ डिसेंबर ७५७ २०३
२६ डिसेंबर ९२२ १७८