Omicron Variant : चिंता वाढली! कर्नाटकानंतर आता गुजरातमध्ये आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 03:23 PM2021-12-04T15:23:55+5:302021-12-04T15:24:27+5:30

Omicron Variant : भारतही कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्गाची (Omicron in India) लागण झालेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.

Omicron Variant : The first case of Omicron variant in Gujarat reported in Jamnagar | Omicron Variant : चिंता वाढली! कर्नाटकानंतर आता गुजरातमध्ये आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला लागण

Omicron Variant : चिंता वाढली! कर्नाटकानंतर आता गुजरातमध्ये आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला लागण

Next

अहमदाबाद : दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. गुरुवारी (दि.03) कोरोना कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमित (Omicron Infection) दोन रुग्ण आढळले आहेत. यानंतर आता गुजरातमध्येही (Gujarat) एक रुग्ण ओमायक्रॉन संक्रमित असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी, गुजरातमधील जामनगरमध्ये (Jamnagar)  एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतली होती. त्यामुळे भारतही कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्गाची (Omicron in India) लागण झालेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.


संपूर्ण जगात धास्ती निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अखेर भारतात प्रवेश केल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. ओमायक्रॉनची बाधा झालेले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले. कर्नाटकात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एक रुग्ण 66 वर्षांचा आहे तर दुसरा 46 वर्षांचा आहे. त्यापैकी एक दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे, तर दुसरा स्थानिक डॉक्टर आहे. दरम्यान, एका बाधिताच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या व्हेरिएंटला सर्वात संसर्गजन्य असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचा रुग्ण सर्वात आधी सापडला होता. दक्षिण आफ्रिकेशिवाय जगातील काही देशांमधून ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत 30 हून अधिक देश या नवीन व्हेरिएंटच्या कचाट्यात आले आहेत. त्यामुळे जगातील अनेक देशांनी आफ्रिकी देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.

ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दल आतापर्यंत काय माहिती आहे?
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटला B.1.1529 असे ओळखले जात होते. नंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word).जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, ज्या पहिल्या नमुन्यातून ओमायक्रॉनची पहिली केस आढळली होती, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. तसेच, या कोरोनाच्या व्हायरसचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत केला आहे.

किती धोकादायक आहे?
कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टासारखा धोकादायक आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी येणे बाकी आहे. सध्या जगभरातील शास्त्रज्ञ या व्हाययरच्या संभाव्यतेचा अभ्यास करत आहेत. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, व्हायरसबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतील. जागतिक आरोग्य संघटनेकडेही या व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती नाही. दरम्यान, या ओमायक्रॉनला चिंतेचा व्हेरिएंट म्हणून संबोधले जात असले तरी, जागतिक आरोग्य संघटने म्हटले होते की, हे आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.

Web Title: Omicron Variant : The first case of Omicron variant in Gujarat reported in Jamnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.