Omicron: ३१ डिसेंबरच्या जल्लोषावर निर्बंध येणार?; ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली, तिसऱ्या लाटेचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 07:49 AM2021-12-21T07:49:37+5:302021-12-21T07:50:17+5:30

भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या भारतात १६१ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत. दिल्लीत मागील ६ महिन्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात १०० हून अधिक रुग्ण आढळले.

Omicron: Will there be a ban on New Year Celebration?; the risk of Corona third wave | Omicron: ३१ डिसेंबरच्या जल्लोषावर निर्बंध येणार?; ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली, तिसऱ्या लाटेचा धोका

Omicron: ३१ डिसेंबरच्या जल्लोषावर निर्बंध येणार?; ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली, तिसऱ्या लाटेचा धोका

googlenewsNext

नवी दिल्ली – देशात ओमायक्रॉनचे (Omicron) वाढत्या रुग्णसंख्येमध्येही लोकं क्रिसमस आणि नवीन वर्षात जल्लोष साजरा करण्याची प्लॅनिंग करत आहेत. परंतु जगातील काही देशांनी खबरदारी घेत यावर्षी क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध आणले आहेत. नेदरलँडने १४ जानेवारीपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लावला आहे. त्याठिकाणी शाळा, कॉलेज, म्युझियम, पब, डिस्कोथेक आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात येणार आहेत.

तर अमेरिका आणि ब्रिटन सरकारनेही क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अंशत: लॉकडाऊन करण्याचा विचार केला आहे. ब्रिटनमध्ये सध्या नाइट क्लब आणि पार्टीला जाण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक केले आहे. इस्त्राइलने आजपासून अमेरिका, कॅनडा, जर्मनीसह १० देशांमधील प्रवाशांना देशात येण्यावर निर्बंध घातले आहेत. फ्रान्समध्ये सरकारने क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आतषबाजीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. जेणेकरुन लोकांनी गर्दी करु नये. आयरलँडमध्ये पब आणि बारमध्ये रात्री ८ नंतर प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

भारतात काय स्थिती?

भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या भारतात १६१ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत. दिल्लीत मागील ६ महिन्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात १०० हून अधिक रुग्ण आढळले. देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ५४, दिल्ली ३२, तेलंगाना २०, राजस्थान १७, गुजरात १३, केरळ ११, कर्नाटक ८, उत्तर प्रदेश २, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, चंडीगढमध्ये ओमायक्रॉनचे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत.

तज्ज्ञांनी दिला तिसऱ्या लाटेचा इशारा

ओमायक्रॉन संक्रमणाचा वेग पाहता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. आयआयटी कानपूरने जानेवारी, फेब्रुवारीत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं म्हटलं आहे. तर नीती आयोगाने देशात तिसरी लाट आली तर दिवसाला १४ लाख रुग्ण आढळू शकतात जो जगातील सर्वात मोठा आकडा ठरू शकतो असं म्हटलं आहे. तर एस्ट्राजेनेका कोविशील्ड लस बनवणाऱ्या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचे प्रोफेसर डेम सारा गिल्बर्ट यांनी पुढील महामारी आणखी जास्त घातक असेल असा इशारा दिला आहे. जोपर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत पूर्ण माहिती मिळत नाही तोवर सतर्क राहणं गरजेचे आहे असंही तज्त्रांनी म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनमुळे हाहाकार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ओमायक्रॉन व्हेरिएंट कारणीभूत ठरू शकतो. सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला त्यानंतर तो जगातील ९१ देशांत पसरला आहे. रविवारी ब्रिटनमध्ये ८२ हजार ८८६ रुग्ण आढळले. ज्यात १२ हजार १३३ रुग्ण केवळ ओमायक्रॉनचे होते. आतापर्यंत देशात ३७ हजार १०१ ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. कदाचित हा आकडा वास्तव्यापेक्षा भयानक असू शकतो असंही तज्त्र म्हणाले.

Web Title: Omicron: Will there be a ban on New Year Celebration?; the risk of Corona third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.