पद्म भूषण पुरस्कारानं गुलाम नबी आझाद यांचा सन्मान; म्हणाले, "माझ्या कामाची दखल घेतली याचा आनंद"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:00 IST2022-03-22T11:59:31+5:302022-03-22T12:00:21+5:30
Padma Bhushan Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म भूषण देऊन गौरव करण्यात आला.

पद्म भूषण पुरस्कारानं गुलाम नबी आझाद यांचा सन्मान; म्हणाले, "माझ्या कामाची दखल घेतली याचा आनंद"
Padma Bhushan Ghulam Nabi Azad : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म भूषण देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आझाद यांचा पद्म भूषण देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कारानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला तसंच आपल्या कामाची कोणी दखल घेतली हे बरं वाटली अशी प्रतिक्रिया दिली.
"कोणाच्याही कामाची दखल घेतली गेली तर त्याला आणखी चांगलं काम करण्याची इच्छा होते. कोणीतरी माझ्या कामाची दखल घेतली याबाबत मला आनंद होत आहे. कोणाला काय मिळालं आणि का मिळालं हे पाहू नये. कारण हा पुरस्कार देशाकडून दिला जाते. पद्म पुरस्कार कोणत्याही सरकारद्वारे नाही, तर देशाकडून दिला जातो," असंही आझाद म्हणाले.
"माझ्या जीवनाच्या टप्प्यात अनेक चढउतार आले. परंतु मी कायमच लोकांसाठी काम करण्याचे प्रयत्न केले, मग ते सामाजिक क्षेत्रात असो किंवा राजकीय," असंही ते म्हणाले. गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरमधून राज्यसभा सदस्य होते. ते पाच वेळा राज्यसभा आणि दोन वेळा लोकसभेवरही खासदार म्हणून निवडून गेले होते.