१९ जूनला अण्णा हजारे राजधानीत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 09:36 IST2022-06-09T09:36:29+5:302022-06-09T09:36:41+5:30
Anna Hazare : दिल्ली वारीत अण्णा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा शेतकरी नेत्यांना भेटणार नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

१९ जूनला अण्णा हजारे राजधानीत, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या १९ जून रोजी राजधानी नवी दिल्लीत येणार असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
येथील एनडीएमसी कन्व्हेंशन सेंटरमध्ये अण्णा कार्यकर्ता संमेलन घेणार आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच राष्ट्रीय लोकआंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी हे शिबिर असल्याची माहिती राष्ट्रीय जनआंदोलनाच्या संयोजक कल्पना इनामदार यांनी दिली.
दिल्ली वारीत अण्णा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा शेतकरी नेत्यांना भेटणार नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.