गणेश चतुर्थीला नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार; जाणून घ्या नव्या संसदेबाबत...!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:13 AM2023-09-07T07:13:46+5:302023-09-07T07:13:52+5:30
१९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे कामकाज नव्या संसदेत सुरू होणार आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे कामकाज नव्या संसदेत सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचे कामकाज १८ सप्टेंबर रोजी संसदेचे जुन्या संसद भवनातच होईल. १९ सप्टेंबरनंतर जुन्या संसद भवनाला ‘राष्ट्रीय संग्रहालया’त बदलण्याचे काम सुरू होणार आहे.
नव्या संसदेबाबत
आसने
८८८ लोकसभा
३८४ राज्यसभा
उद्घाटन
२८ मे २०२३४
मजले- जागा
६४ हजार+ चाैरस मीटर