‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा; महाराष्ट्रासह अनेक राज्यात नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 03:06 PM2024-10-15T15:06:56+5:302024-10-15T15:08:02+5:30

महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या सायबर गुन्हेगारीसाठी हजारो तरुण ट्रेनिंग घेत आहेत. पोलिस सध्या आरोपींना शोधण्याचे काम करत आहेत.

on the name of 'Pregnant Job', youths are extorting lakhs of rupees; Network in many states including Maharashtra | ‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा; महाराष्ट्रासह अनेक राज्यात नेटवर्क

‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा; महाराष्ट्रासह अनेक राज्यात नेटवर्क

नवी दिल्ली : सायबर गुन्हेगार समाजमाध्यमांवर फसवणुकीचे रोज नवनवे फंडे बाहेर काढत असून, यात आता त्यांनी महिलांना गर्भवती करण्याच्या नावाखाली लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. यात अनेकांना फटका बसला असला तरीही ते इभ्रत जाईल या भीतीने ते पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये या सायबर गुन्हेगारीसाठी हजारो तरुण ट्रेनिंग घेत आहेत. पोलिस सध्या आरोपींना शोधण्याचे काम करत आहेत.

काय असते जाहिरातीमध्ये?
सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर महिलांना गर्भवती करण्याच्या नावाखाली ‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली जाहिरात देतात. यात महिलांना गर्भवती करा अन् लाखो रुपये मिळवा, असे म्हटलेले असते. यात आपली माहिती गुप्त ठेवण्यासह याचा संपूर्ण खर्च महिलेकडून करण्यात येईल, असे सांगितले जाते. 

गंडा कसा?
- तरुण जाळ्यात अडकले की त्यांना  ‘प्रेग्नंट जॉब’चा सर्व खर्च महिला करेल. सर्व वस्तूंची बुकिंग तरुणीकडून होईल, असे सांगितले जाते.
- यात नोंदणीसाठी ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात. यानंतर महिलेचा फोटो आणि व्हिडीओ दाखवून बोलणेही करून दिले जाते.

प्रकरण १
- हरयाणाच्या नूंहमध्ये सायबर पोलिसांनी बुराका, पिनंगवा यांना २९ सप्टेंबर रोजी पकडले होते. 
- तपासात आरोपींनी महाराष्ट्रात ‘प्रेग्नंट जॉब’च्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी पोलिसांच्या भीतीने आपला मोर्चा राजस्थान आणि हरयाणाकडे वळवला. आतापर्यंत त्यांना शेकडो लोकांची फसवणूक केली आहे.

प्रकरण २
- बिहारच्या नवादामध्ये याच प्रकारची फसवणूक करणारे आरोपी २ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले.
- ३ पैकी १ आरोपीने गंडा घालण्याचे ट्रेनिंग घेत अनेकांची फसवणूक केली. या आरोपींनीही बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे ४०० पेक्षा अधिक जणांना गंडा घातला आहे.
३-४००० रुपये सुरुवातीला नोंदणी आणि जीएसटीच्या नावाखाली वसूल केले जातात.
९०% पेक्षा अधिक अल्पवयीन तरुणांचा या सायबर गुन्हेगारीत समावेश.
 

Web Title: on the name of 'Pregnant Job', youths are extorting lakhs of rupees; Network in many states including Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.