कमाल! एकेकाळी विमानतळावर साफसफाईचं काम केलं, आता आहे 10 कोटींच्या कंपनीचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 04:02 PM2023-02-07T16:02:44+5:302023-02-07T16:12:53+5:30
मेहनतीने एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी उभी केली आहे आणि आज कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे.
तुम्ही कोणतंही काम पूर्ण समर्पणाने केलं आणि कधीही हार मानली नाही तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. अशाच एक व्यक्तीबद्दल जाणून घेऊया... आमिर कुतुब असं या व्यक्तीचं नाव आहे. आमिर कुतुब हा एकेकाळी विमानतळावर सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. पण आज त्याने आपल्या मेहनतीने एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी उभी केली आहे आणि आज तो कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे.
आमिर कुतुब यांचा जन्म अलीगड, उत्तर प्रदेश (यूपी) येथील एका सामान्य कुटुंबात झाला. आमिरचं जीवन आव्हानांनी भरलेलं आहे. आमिरने बारावीनंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. मात्र, त्यांना इंजिनीअरिंग करायचं नव्हतं. यादरम्यान आमिरने 2011 मध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली होती. यानंतर अमीरची सचिवपदी निवड झाली. यानंतर तो दिल्लीतील होंडा कंपनीत काम करू लागला. त्यानंतर आमिरने नोकरी सोडली आणि वेबसाइट डिझाइनसाठी फ्रीलान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
आमिरचे काही क्लायंट अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही होते. यानंतर आमिरने स्टुडंट व्हिसासाठी अर्ज केला. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला गेला. आमिर कुतुबने ऑस्ट्रेलियात सुमारे 4 महिन्यांत 170 हून अधिक ठिकाणी नोकरीच्या मुलाखती दिल्या. मात्र त्याची कुठेही निवड झाली नाही. त्याने ऑस्ट्रेलियातील विमानतळावर सफाई कर्मचारी म्हणून काम केलं. आमिरला पैशांची गरज होती. यासाठी त्याने वर्तमानपत्र वाटण्याचं कामही केले. यानंतर त्याने स्वतःची कंपनी स्थापन केली.
कुटुंबीयांना आमिर कुतुबच्या संघर्षाची माहिती मिळाल्यावर कुटुंबीयांनी त्याला परत येण्यास सांगितले पण आमिरने आपल्या कुटुंबाचे ऐकले नाही आणि आपला व्यवसाय यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू केला. अथक परिश्रम करून त्यांनी आपली कंपनी ऑस्ट्रेलियात नोंदणीकृत करून घेतली. आमिरने आपल्या मेहनतीने आयुष्यात यश मिळवले आहे. आमिरचा व्यवसाय हळूहळू सुरू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज आमिरची कंपनी 4 देशांमध्ये आहे. त्यांची सुमारे 10 कोटी रुपयांची उलाढाल आहे. कंपनीत 100 कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. यासोबतच जवळपास 300 कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"